कर्तव्य पथ पे ‘सदैव अटल’ वाजपेयींना आदरांजली 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2022 07:59 AM2022-12-26T07:59:36+5:302022-12-26T08:00:33+5:30

शहा यांनी येथील ‘सदैव अटल’ या वाजपेयींच्या स्मारकाला भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

tribute to sadaiv atal vajpayee on duty path on occasion of his memorial day | कर्तव्य पथ पे ‘सदैव अटल’ वाजपेयींना आदरांजली 

कर्तव्य पथ पे ‘सदैव अटल’ वाजपेयींना आदरांजली 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली: माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या ९८व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु, उपराष्ट्रपती जगदीप धनखड, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी रविवारी येथील ‘सदैव अटल’ स्मारक येथे आदरांजली वाहिली.

याशिवाय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष जेपी नड्डा, राज्यसभेचे उपसभापती हरिवंश आणि अर्थमंत्री निर्मला सीतारमन यांच्यासह अनेक केंद्रीय मंत्री आणि मान्यवरांनीही आदरांजली वाहिली. 

वाजपेयींची देशभक्ती प्रेरित करते: शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा म्हणाले, वाजपेयी यांची देशभक्ती, कर्तव्यनिष्ठा आणि समर्पण प्रत्येकाला देशसेवेसाठी प्रेरित करेल. शहा यांनी येथील ‘सदैव अटल’ या वाजपेयींच्या स्मारकाला भेट दिली आणि त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: tribute to sadaiv atal vajpayee on duty path on occasion of his memorial day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.