शहरं
Join us  
Trending Stories
1
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
2
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
3
Top Marathi News Live: आयपीएल २०२६ प्लेऑफची शर्यत रंगात; केकेआरच्या विजयानंतर गुणतालिकेत मोठा बदल
4
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
5
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
6
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
7
Heatwave: देशात उष्णतेचा कहर, 'या' ६ राज्यात आग ओकतोय सूर्य, पुढील तीन दिवस घ्यावी लागेल काळजी!
8
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
9
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
10
याला म्हणतात मराठी माणूस! परप्रांतीय रिक्षा चालकांच्या संपाच्या दिवशी स्वत:ची गाडी टॅक्सी म्हणून रस्त्यावर उतरवणार शिव ठाकरे, म्हणाला...
11
Bank of Baroda मध्ये ₹१,१०,००० जमा करा, मिळेल ₹४५,६२६ चं फिक्स्ड रिटर्न; पाहा कॅलक्युलेशन
12
Vijay Wadettiwar: 'अमेरिकेप्रमाणेच भारतही विनाशाच्या मार्गावर', काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार असं का म्हणाले?
13
VIDEO: शाहीन आफ्रिदीच्या एका वर्षाच्या मुलाकडून बाबर आझम 'क्लीन बोल्ड'; झाला तुफान ट्रोल
14
इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा! पाकिस्तानमार्फत पाठवला 'रेड लाईन'चा संदेश; काय आहे प्लॅन?
15
IPL 2026 Points Table : प्लेऑप्सच्या शर्यतीत कोण टिकणार? KKR नं MI ला टाकलं मागे; LSG तळाला!
16
तुमच्या मुलीच्या खात्यात येतील ६९,२७,५७८ रुपये, तुम्हाला या योजनेत किती करावी लागेल गुंतवणूक, पैसेही राहतील सुरक्षित
17
अमराठी रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी अनिवार्य कशी करावी?; महत्त्वपूर्ण बैठकीत आज होणार मंथन
18
२० लाखांचे पॅकेज असूनही 'एक रुपया'ही टॅक्स भरावा लागणार नाही; हे नक्की करा
19
आजचे राशीभविष्य - २७ एप्रिल २०२६, वडील व वडीलधार्‍यांकडून लाभ होईल, समाजात मान-प्रतिष्ठा वाढेल
20
एमआयडीसी मुख्यालय निविदेला पाचवी मुदतवाढ; ‘रतन टाटा उद्योग भवन’ प्रकल्पाला मिळणार वेग
Daily Top 2Weekly Top 5

प्रवासाचे बनावट बिल अंगलट

By admin | Updated: February 13, 2015 00:38 IST

फसवणूक : केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल नागपूर : एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमरदीपसिंग असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते केंद्रीय जल आयोगात उप संचालक आहेत. सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्रीय जल ...


फसवणूक : केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल
नागपूर : एअर इंडियाच्या प्रवासाचे बनावट बिल सादर करण्याचा प्रयत्न केंद्रीय जल आयोगाच्या एका अधिकाऱ्याच्या अंगलट आला. पोलिसांनी या प्रकरणात फसवणुकीचे गुन्हे दाखल केले. अमरदीपसिंग असे या अधिकाऱ्याचे नाव असून, ते केंद्रीय जल आयोगात उप संचालक आहेत.
सेमिनरी हिल्स परिसरातील केंद्रीय जल आयोगाच्या कार्यालयात सिंग कार्यरत आहेत. रजा प्रवास सवलती अंतर्गत ऑक्टोबर २०१४ ला त्यांनी नागपूर ते बागाडोंगरा आणि परत नागपूर असा सहपरिवार (चारजण) विमान प्रवास केला. या कालावधीचे प्रवास बिल त्यांनी कार्यालयात सादर केली. एअर इंडियाच्या तिकिटात तफावत जाणवत असल्यामुळे कार्यालयातील वरिष्ठांनी एअर इंडियाला पत्र देऊन सिंग यांनी केलेल्या प्रवासाच्या तारखेच्या वेळी तिकिटांचे दर काय होते, त्याची चौकशी केली. ९२०० रुपये प्रति तिकिटांप्रमाणे ३६,८०० रुपये प्रवास भाड्याचे झाल्याचे त्यातून उघड झाले. प्रत्यक्षात सिंग यांनी प्रति तिकीट सुमारे २२ हजार रुपयाचे बिल (एका तिकिटामागे सुमारे १३ हजार जास्त) लावले होते. त्यांनी या प्रवासी बिलाच्या माध्यमातून शासनाला ५१,८२८ रुपयांचा गंडा घालण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाल्यामुळे कार्यालयाचे अधीक्षक दिवाकर मोतीराम रायपुरे यांनी गिट्टीखदान पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. त्यावरून पोलिसांनी बुधवारी सिंग यांच्या विरोधात फसवणुकीच्या आरोपाखाली कलम ४६८, ४७१ अन्वये गुन्हे दाखल केले. वृत्त लिहिस्तोवर सिंग यांना अटक झालेली नव्हती.
अधिकाऱ्यांत खळबळ
बनावट प्रवासी बिलांचा गैरप्रकार उघड झाल्यामुळे आणि एका वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हे दाखल झाल्यामुळे संबंधित वर्तुळात खळबळ निर्माण झाली आहे.
---