शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला 'टोल' दिला तर खैर नाही! अमेरिकेचा जगाला सज्जड दम, सर्व जहाज कंपन्यांवर बंदीची टांगती तलवार
2
आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६: कुंभ, मकर राशीला भाग्याची साथ; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस
3
राज्यात कोकणचाच डंका; लातूर पुन्हा तळाशी! बारावीचा निकाल घटला
4
रस्त्याच्या कामात भीषण अपघात! क्रेनचा प्लॅटफॉर्म तुटून २ कामगारांचा जागीच मृत्यू
5
भोंदू खरात बिल्डरच्या खर्चाने फिरून आला तब्बल २१ देश;नवव्या गुन्ह्यात आणखी ४ दिवसांची पोलिस कोठडी
6
होर्मुझला पर्याय काय? इराणच्या दहशतीखाली जगाची 'लाईफलाईन' अडकली
7
मोबाइलवर वाजला अचानक वॉर्निंग सायरन अन् पसरली घबराट; 'सेल ब्रॉडकास्ट अलर्ट' प्रणाली देशभरात लाँच
8
मतमोजणी कर्मचाऱ्यांच्या निवडीचा निवडणूक आयोगाला अधिकार; तृणमूल काँग्रेसच्या याचिकेवर निकाल
9
छत्तीसगड : भूसुरुंग निकामी करताना चार जवान शहीद;'माओवाद मुक्ती'च्या केंद्राच्या घोषणेला धक्का
10
भाईंदरमधील २२० एकर मिठागरांवरील केंद्राचा दावा उच्च न्यायालयाने फेटाळला; जमीन खासगी व्यक्तीची असल्याचे स्पष्टीकरण
11
जबलपूर क्रुझ दुर्घटनेतील दोन बालकांचे मृतदेह सापडले; मृतांची संख्या ११ वर
12
नसरापूर प्रकरण: ...अखेर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना महामार्गावरून हटवले, पीडीतेचे पार्थिव वैकुंठ स्मशानभूमीत दाखल
13
पश्चिम बंगाल: फाल्टा मतदारसंघात पुन्हा मतदान, निकालाची तारीखही बदलली! निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय
14
नसरापूर प्रकरण: राष्ट्रीय महिला आयोगाने घेतली दखल, व्यक्त केला तीव्र संताप; तपासावर राहणार थेट लक्ष
15
नसरापूर प्रकरण : "पीडित चिमुकलीचे आई-वडील मुख्यमंत्र्यांच्या भूमिकेशी सहमत, मात्र काही लोक..."; काय म्हणाले अमितेश कुमार?
16
धामणगाव येथे अग्नितांडव, ‘वणव्या’ने राख केले ५० कुटुंबांचे स्वप्न; जनावरांचा कोळसा अन् ग्रामस्थांचा टाहो
17
नसरापूर प्रकरण: "नराधमाला फासावर चढवण्यासाठी भक्कम पुरावे गोळा करा"; एकनाथ शिंदे यांचे पोलीस अधीक्षकांना निर्देश, खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार
18
CSK विरुद्धच्या पराभवानंतर MI कॅप्टन हार्दिक पांड्याचं मोठं वक्तव्य; म्हणाला, "हा हंगामच आमचा नाही"
19
नसरापूर प्रकरण: "तुमच्या मागणीनुसारच सर्व तपास होणार, सरकारने...!" पोलीस आयुक्तांचे आश्वासन; पिडीतेच्या नातेवाईकांशीही साधला संवाद 
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी

By admin | Updated: January 22, 2015 00:07 IST

रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी

रेल्वेगाडीच्या कोचमध्ये शिरले पाणी
तक्रारीकडे दुर्लक्ष : प्रवाशांनी चेन पुलिंग करून घातला गोंधळ
नागपूर : गाडीत पाणी भरावयाचा पाईप तुटल्यामुळे पाणी कोचवर उडून खिडकीतून कोचमध्ये आल्यामुळे बिलासपूर-भगत की कोठी समर स्पेशल या गाडीचे एस-२, एस-३ कोच जलमय झाले. प्रवाशांनी तक्रार करूनही कोचमधील पाणी बाहेर न काढता ही गाडी रवाना केल्यामुळे प्रवाशांनी चेन पुलिंग केले. त्यामुळे काही अंतरावर गेलेली ही गाडी पुन्हा रेल्वेस्थानकावर आणण्यात आली. या गोंधळात या गाडीला दोन तासाचा विलंब झाला.
रेल्वेगाडी क्रमांक ०८२४३ बिलासपूर-भगत की कोठी समर स्पेशल ही गाडी रात्री १.१० वाजता नागपूर रेल्वेस्थानकाच्या प्लॅटफार्म क्रमांक ६ वर आली. या गाडीत पाणी भरत असताना अचानक पाणी भरण्याचा पाईप तुटला. त्यामुळे पाण्याचा फवारा या गाडीच्या एस-२, एस-३ कोचवर उडाला. कोचवरील पाणी खिडकीतून या दोन्ही कोचमध्ये शिरले. दोन्ही कोचमध्ये राम देवरा यात्रेला जाणारे श्री रामदेव मंदिर समिती सब्जी मंडी गोंदिया येथील २०० भाविक होते. कोचमध्ये पाणी आल्यामुळे हिवाळ्यात आणखी त्रास होईल या भीतीने या भाविकांनी रेल्वे प्रशासनाकडे कोचमधील पाणी बाहेर काढण्याची मागणी केली. परंतु त्यांची मागणी न ऐकताच ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना करण्यात आली. ही गाडी नागपूर रेल्वेस्थानकाच्या काही अंतरावर गेल्यानंतर प्रवाशांनी चेन पुलिंग करून गोंधळ घालण्यास सुरुवात केली. भाविकांनी गाडीच्या गार्डसोबत हुज्जत घातली. अखेर ही गाडी पुन्हा परत मागे आणण्यात आली. त्यानंतर सफाई कर्मचाऱ्यांना बोलावून या गाडीच्या कोचची सफाई करण्यात आली. रात्री ३.२० वाजता ही गाडी पुढील प्रवासासाठी रवाना झाली. (प्रतिनिधी)
...............