शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर: हवाई दलाच्या वाहनांवर दहशतवाद्यांचा गोळीबार; लष्कराचे काही जवान जखमी
2
विराट कोहलीचा भन्नाट रन आऊट! नाका तोंडाशी पाणी आल्यावर RCB कडून झाली सांघिक कामगिरी
3
मोठी बातमी: लैंगिक शोषण आणि अपहरण प्रकरणात एचडी रेवन्ना यांना SITकडून अटक
4
विझण्यापूर्वी RCB ची फडफड! गुजरात टायटन्सविरुद्ध दाखवली 'पॉवर'; यंदाच्या पर्वात रचला इतिहास
5
अरे तुला फरक पडत नाही, मग कशाला उत्तर देतोस? सुनील गावस्कर संतापले, विराट कोहलीला सुनावले
6
पैशांची कमतरता, पक्षही देईना, निवडणूक लढू शकणार नाही; काँग्रेसच्या महिला उमेदवारानं परत केलं तिकीट
7
PHOTOS : क्रिकेट म्हणजे जीवन आणि क्रिकेट हेच जीवन; IPL मध्ये जान्हवी कपूरचा जलवा!
8
रोहित शर्माचे काल प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणे ही भारतासाठी डोकेदुखी; MI ने सांगितलं टेंशन वाढवणारं कारण
9
'घेऊद्या तारीख, ईडीच्या प्रकरणात कुठे जामीन मिळतो'; न्यायाधिशांचे कोर्टरुमबाहेर धक्कादायक वक्तव्य
10
लोकसभेचा निकाल लागताच चित्र बदलणार; थरूर यांनी सांगितला 'इंडिया' आघाडीचा प्लॅन
11
"अरविंद केजरीवालांनी वाराणसीतून नरेंद्र मोदींच्या विरोधात निवडणूक लढवावी"; सपा नेत्याची मागणी
12
मला धमक्या देऊ नका, मी मनात आणलं तर..., नारायण राणे यांचा उद्धव ठाकरेंना इशारा
13
पाकिस्तानच्या माजी मंत्र्यांकडून दुसऱ्यांदा राहुल गांधींचं कौतुक; भाजपानं घेरलं
14
IPL 2024 मधील दोन भारतीय स्टार गोलंदाज स्पर्धेत आता पुढे कदाचित नाही खेळू शकणार 
15
NSE Share : एकावर ४ बोनस शेअर्स, ९०००% डिविडंड; 'या' एक्सचेंजनं गुंतवणूकदारांना दिलं डबल गिफ्ट
16
"हार्दिक पांड्याबद्दल आदर दिसत नाही", इरफान पठाणकडून MI च्या कॅप्टनची बिनपाण्याने धुलाई
17
T20 World Cup : यजमान विडिंजने उतरवला तगडा संघ; IPL गाजवणाऱ्यांना संधी, नवे चेहरेही मैदानात!
18
रोहित शर्माबद्दल 'ती' अफवा पसरवली; आकाश चोप्रा भडकला, दिली संतप्त प्रतिक्रिया
19
कांदा निर्यातबंदी उठवण्याच्या निर्णयावर काँग्रेसची टीका, बाळासाहेब थोरात म्हणाले...
20
Kotak Mahindra Bank Q4: नफा वाढून ४१३३ कोटींवर, व्याजातून होणारी कमाई १३.३% वाढली

देशी बनावटीची हायस्पीड ट्रेन 18 परीक्षेत पास, जाणून घ्या काय आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 4:25 PM

देशातील सर्वात वेगवान ट्रेनची चाचणी यशस्वी

नवी दिल्ली: देशातील अत्याधुनिक रेल्वे गाडी असलेल्या ट्रेन 18 नं नवा विक्रम रचला आहे. संपूर्णपणे देशी बनावटीची ही रेल्वे गाडी आज चाचणी दरम्यान 180 किलोमीटर प्रति तास वेगानं धावली. त्याआधी पहिल्या चाचणीत ही रेल्वे 160 किलोमीटर प्रति तास इतक्या वेगानं धावली होती. आजची चाचणी यशस्वी झाल्यानं ट्रेन 18 देशातील पहिली सेमी हाय स्पीड ठरली आहे. ट्रेन 18 ची महत्त्वपूर्ण चाचणी आज पार पाडली. यावेळी या गाडीच्या निर्मितीत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणारे आयसीएफचे प्रमुख सुधांशू मनी उपस्थित होते. विशेष म्हणजे कोणत्याही तांत्रिक अडचणीशिवाय या ट्रेनची चाचणी पूर्ण झाली. या चाचणीदरम्यान गाडीला जराही झटका बसला नाही. यासोबतच कोणतीही कंपनं जाणवली नाहीत. त्यामुळे ही गाडी 200 किलोमीटर प्रति तास वेगानंदेखील धावू शकेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या ट्रेनची यशस्वी चाचणी हे भारतीय रेल्वे आणि आयसीएफचं मोठं यश मानलं जातं आहे. कोटा ते सवाई माधोपूर या भागात ट्रेन 18 ची चाचणी घेण्यात आली. सध्याच्या घडीला गतीमान एक्स्प्रेस ही देशातील सर्वात वेगानं धावणारी ट्रेन आहे. या ट्रेनचा वेग 160 किलोमीटर प्रति तास इतका आहे. ही ट्रेन आग्रा ते दिल्ली दरम्यान धावते. मात्र ट्रेन 18 नं गतीमान एक्स्प्रेसला मागे टाकलं आहे. ट्रेन 18 ची निर्मिती मेक इन इंडिया प्रोजेक्ट अंतर्गत करण्यात आली आहे. या ट्रेनची तांत्रिक चाचणी मुरादाबाद ते बरेली दरम्यान घेण्यात आली होती. या चाचणीत ही ट्रेन उत्तीर्ण झाली होती.  

टॅग्स :railwayरेल्वेIndian Railwayभारतीय रेल्वे