Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2023 07:55 IST2023-05-30T07:50:57+5:302023-05-30T07:55:22+5:30
Jammu Bus Accident: या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे.

Jammu Bus Accident : जम्मूमध्ये भीषण अपघात, वैष्णो देवीला जाणारी बस दरीत कोसळली; 10 जणांचा मृत्यू
जम्मू काश्मीरमध्ये मंगळवारी मोठा अपघात झाला. येथे अमृतसरहून वैष्णो देवीकडे (कट्रा) जाणारी बस दरीत कोसळली. या अपघातात 10 जणांचा मृत्यू झाल्याचे समजते. तसेच अनेक लोक जखमी झाल्याचेही वृत्त आहे. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ही बस अमृतसरहून कट्रा येथे जात होती. ती नॅशनल हायवे क्रमांक 44 वर झज्जर कोटलीला पोहोचल्यानंतर, अनियंत्रित झाली आणि दरीत कोसळली. या बसमध्ये जवळपास 75 लोक होते, असे बोलले जात आहे. यांपैकी 10 जणांचा मृत्यू झाला, तर इतर जखमींना जम्मू येथे उपचारासाठी हलवण्यात आले आहे.
#WATCH | J&K | A bus going from Amritsar to Katra fell into a deep gorge. As per Jammu DC, 10 people died in the accident. More details awaited.
— ANI (@ANI) May 30, 2023
Visuals from the spot. pic.twitter.com/fM2rN0fMSN
एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, CRPF अधिकारी अशोक चौधरी यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, सकाळच्या सुमारास या घटनेची माहिती मिळताच आमच्या टीमने येथे पोहोचून रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले. मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमींना रुग्णालयात पोहोचवण्यात आले आहे. पोलिसांची टीमही आमच्या सोबतच रेस्क्यू ऑपरेशन करत आहे. रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. तसेच, या बसमध्ये बिहारमधीलही काही लोक असल्याचे समजते. हे लोक कटरा येथे जात होते.