शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
4
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
5
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
6
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
7
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
8
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
9
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
10
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
11
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
12
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
13
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
14
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
15
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
16
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
17
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
18
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
19
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
20
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट

तामिळनाडूत भीषण दुर्घटना; मुसळधार पावसामुळे घर कोसळलं, 4 मुलांसह 9 जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 4:39 PM

मुख्यमंत्र्यांनी केली मृतांच्या कुटुंबीयांना 5-5 लाख रुपये देण्याची घोषणा.

चेन्नई: मागील काही दिवसांपासून दक्षिणेकडील तामिळनाडू राज्यात पावसाने हाहाकार माजवला आहे. राज्याच्या अनेक ठिकाणी मुसळधार पावसाने मोठे नुकसान केले असून, अनेकांचा मृत्यूही झालाय. यातच मुसळधार पावसामुळे पुन्हा एकदा मोठी दुर्घटना घडली आहे. वेल्लोर शहरात सकाळी एक घर कोसळून 9 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 4 मुले आणि 4 महिलांचा समावेश आहे.

मुख्यमंत्र्यांची प्रत्येकी 5 लाख देण्याची घोषणाया दुर्घटनेची माहिती मिळताच प्रशासनाचे बचाव पथक घटनास्थळी पोहोचले असून युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू आहे. घराच्या ढिगाऱ्याखाली आणखी लोक अडकले असण्याची शक्यता असून, त्यांना बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान, या घटनेनंतर  मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांनी अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. 

पद्दुचेरीत मुसळधार पाऊस

हवामान खात्याने चेन्नई, कुड्डालोर, विल्लुपुरम, चेंगलपट्टू, कांचीपुरम, तिरुवल्लुवरसह तामिळनाडूच्या 16 जिल्ह्यांसाठी पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे. यासोबतच नजीकच्या केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरीमध्येही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 जिल्ह्यांमध्ये सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. शाळा बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

आंध्रमध्ये पुराचा कहर, नद्या-नाले तुडूंब भरले

गुरुवारी झालेल्या मुसळधार पावसानंतर आंध्र प्रदेशातील किनारपट्टी भागात पुराने कहर केला आहे. पावसामुळे डोंगरावरचे झरे आणि नदी-नाले दुथडी भरुन वाहत आहेत. तिकडे तिरुपतीच्या प्रसिद्ध मंदिरातही पाणी शिरले आहे. सखल भागातील रस्त्यांवर वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाहात वाहने वाहून जात आहेत. तसचे, शहरालगतच्या ग्रामीण भागात आलेल्या पुरात शेकडो जनावरे वाहून गेली आहेत. एकूणच नुकसानीचे आकलन करणे कठीण आहे. 

टॅग्स :TamilnaduतामिळनाडूRainपाऊसfloodपूरAndhra Pradeshआंध्र प्रदेश