गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2025 21:41 IST2025-05-03T21:39:21+5:302025-05-03T21:41:32+5:30

गुजरातमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Tragic accident in Sabarkantha jeep and bus collided 6 people died | गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

गुजरातच्या साबकांठामध्ये मोठा अपघात; बस, जीप आणि दुचाकीच्या धडकेत सहा प्रवाशांचा जागीच मृत्यू

Gujarat Accident:गुजरातमधील साबरकांठा जिल्ह्यातून एका भीषण रस्ते अपघाताची बातमी आली आहे. साबरकांठा येथे जीप, बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या धडकेत ६ जणांचा मृत्यू झाला. साबरकांठा येथे एक जीप, राज्य परिवहन बस आणि एका दुचाकीची जोरदार धडक झाली. या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला तर ८ जण जखमी झाले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मृतांमध्ये एका लहान मुलीचा देखील समावेश आहे.

शनिवारी हा भीषण अपघात हिंगाटिया गावाजवळील राज्य महामार्गावर घडला. जीप आणि बसच्या धडकेनंतर एका दुचाकीने मागून जीपला धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की, सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुचाकीवर तीन जण होते. मृतांपैकी बहुतेक लोक जीपमधून प्रवास करत होते. धडकेनंतर जीपचे तुकडे झाले. जखमींवर जिल्हा मुख्यालय हिम्मतनगर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मृतांपैकी बहुतेक जण साबरकांठा जिल्ह्यातील पुरुष होते.

अपघाताच्या वेळी, राज्य परिवहन महामंडळाची बस बनासकांठा जिल्ह्यातील अंबाजी येथून वडोदरा येथे जात होती. तर जीप समोरून येत होती. यावेळी तीन दुचाकीस्वारही जीपच्या मागून येत होते. या धडकेत जीपचे मोठे नुकसान झाले. मृतांमध्येही सर्वाधिक जीपमधील आहेत.

दरम्यान, मुथरेतही भीषण अपघाताची घटना घडली. एक भरधाव थार आणि एका प्रवासी टेम्पोमध्ये झालेल्या धडकेत अनेक जण जखमी झाले. रस्त्यावर ओरड आणि आरडाओरडा सुरू झाला. तेव्हा एका भरधाव डंपरने जखमींना चिरडले ज्यात चार जणांचा मृत्यू झाला. मथुराच्या जैत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामताल नागला जाणाऱ्या रस्त्यावर कृष्णा कुटीरजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगाने येणाऱ्या एका कारने एका प्रवासी टेम्पोला धडक दिली होता. टक्कर इतकी जोरदार होती की टेपचे तुकडे तुकडे झाले. त्यानंतर जखमी रस्त्यावर थांबलेले असताना भरधाव डंपरने जखमींना चिरडले. 
 

Web Title: Tragic accident in Sabarkantha jeep and bus collided 6 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.