SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2025 16:30 IST2025-11-22T16:30:27+5:302025-11-22T16:30:56+5:30
मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी अश्वनी कुमार पांडेय यांनी मोठी ऑफर जाहीर केली आहे.

SIRचे काम करण्यासाठी बीएलओंना 'आमिष'...! कुटुंबासह मोफत पर्यटन आणि 'फाइव्ह स्टार' जेवण मिळणार, कुठे...
निवडणूक आयोगाचे मतदार यादी पुनरीक्षण करण्याचे सरकारी काम वेळेत आणि कार्यक्षमतेने करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी उत्तर प्रदेशच्या श्रावस्ती जिल्हा प्रशासनाने एक अत्यंत आकर्षक योजना सुरू केली आहे. मतदार यादीच्या विशेष गहन पुनरीक्षण मोहिमेमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या ब्लॉक लेव्हल ऑफिसर्स कर्मचाऱ्यांसाठी जिल्हाधिकारी अश्वनी कुमार पांडेय यांनी मोठी ऑफर जाहीर केली आहे.
जे BLOs २७ नोव्हेंबरपर्यंत त्यांच्या भागातील सर्व मतदारांचे डिजिटायझेशनचे काम १०० टक्के पूर्ण करतील, त्यांना प्रशासनातर्फे प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित केले जाईल. इतकेच नव्हे, तर या कर्मचाऱ्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासोबत एका चांगल्या हॉटेलात जेवण (लंच व डिनर) करण्याची आणि मोफत पर्यटन करण्याची संधी मिळणार आहे.
कुटुंबासह चांगल्या हॉटेलात लंच (दुपारचे) आणि डिनर (रात्रीचे) करण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच भिनगाच्या जंगलात असलेल्या 'फ्रेश वॉटर मॅंग्रोव्ह सफारी' मध्ये कुटुंबासह फिरण्याची खास व्यवस्था केली जाणार आहे.
या उपक्रमामागे SIR वेगाने आणि प्रभावीपणे पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे. ४ डिसेंबरपर्यंत चालणाऱ्या या अभियानात कर्मचाऱ्यांचा उत्साह वाढवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने हे प्रेरणादायी पाऊल उचलले आहे. एकीकडे सिरच्या ताणामुळे वेगवेगळ्या राज्यांत ८ बीएलओंनी आत्महत्या केल्या आहेत, यामुळे बीएलओंमध्ये प्रचंड रोष असून या कामाला विरोध केला जात आहे. अशातच या जिल्ह्यात बीएलओंकडून काम करून घेण्यासाठी हे आमिष देण्यात आले आहे.