शहरं
Join us  
Trending Stories
1
दिवाळी एकत्र साजरी करू, पण अजित पवारांना पुन्हा पक्षात नो एंट्री; शरद पवारांनी परतीचे दरवाजे बंद केले...
2
सुप्रियाने पवार-सुळे असे नाव लावले असते तर..? शरद पवारांनी सांगितला तिने घेतलेला एक निर्णय...
3
आजचे राशीभविष्य - ०९ मे २०२४ : आर्थिक फायदा संभवतो,विवाहेच्छुकांचे विवाह ठरू शकतील
4
महागाईवर सर्वात खळबळजनक रिपोर्ट; तीन वर्षांत कुटुंबांची घरगुती बचत ९ लाख कोटींनी घटली
5
साताऱ्याच्या बदल्यात राज्यसभा मिळाली! पार्थ पवारांना दिल्लीत पाठविण्यावर अजित पवारांचे मोठे संकेत
6
...म्हणून दक्षिण मुंबईची जागा लढवली नाही; मनसे नेते बाळा नांदगावकर यांचा खुलासा
7
अदानी-अंबानींकडून टेम्पाेने पैसा आला का? मोदींच्या सवालावर राहुल गांधींचे चोख प्रत्युत्तर...
8
नावात काय आहे? विचारत हायकोर्टाने फेटाळल्या नामांतराविरोधातील याचिका
9
कर्मचारी सुट्टीवर; विमाने जमिनीवर; ‘एअर इंडिया एक्स्प्रेस’ची ९० उड्डाणे रद्द
10
मी ठाण मांडून बसलो, म्हणजे करेक्ट कार्यक्रम होणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
11
शाळेत अ‍ॅडमिशन मिळणार का? न्यायालयात स्थगितीनंतर आरटीई ऑनलाइन अर्जाला ब्रेक, पालक अस्वस्थ 
12
हेड, अभिषेकने घातला धुमाकूळ; लखनौचा पाडला फडशा; हैदराबादचा १० गड्यांनी दणदणीत विजय
13
तीन वर्षांनंतर भारतात खेळणार नीरज; राष्ट्रीय फेडरेशन चषक स्पर्धेची उत्सुकता शिगेला
14
पूर्वेकडचे लोक चिनी, दक्षिणेतील आफ्रिकींसारखे; सॅम पित्रोदा यांचे वादग्रस्त उद्गार; काँग्रेसने घेतला राजीनामा
15
राज्यात लोकसभेनंतर रंगणार शिक्षक, पदवीधर निवडणूक; १० जूनला मतदान, १३ जूनला निकाल
16
महादेव ॲपशी निगडित १ हजार कोटी शेअर्समध्ये? बनावट कंपन्यांद्वारे गुंतवणुकीचा संशय
17
महिनाभरात २२ लाख वाहनांची विक्री; २७ टक्के वाढ;  देशभरातील खरेदीदारांमध्ये प्रचंड उत्साह
18
टेनिस बॉल क्रिकेटमधून शिकलो ‘सुपला शॉट’; सूर्यकुमार यादवने सांगितली आठवण; आपसूक मारला जातो हा फटका
19
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
20
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर

मोदी, कोहली नव्हे 2019 मध्ये भारतीयांनी या व्यक्तीचं नाव केलं गुगलवर सर्वाधिक सर्च 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 11, 2019 4:09 PM

Flashback 2019 : यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे

नवी दिल्ली - सरत्या वर्षामध्ये अनेक व्यक्तिमत्त्वांनी भारतीय जनमानसावर आपली छाप पाडली. काही प्रस्थापित व्यक्तिमत्त्वांसोबतच अनेक नवे चेहर या वर्षभरात देशवासियांमध्ये चर्चेचा विषय ठरले. या प्रसिद्ध व्यक्तींबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी नेटिझन्सनी त्यांचे नाव मोठ्या प्रमाणावर गुगववर सर्च केले. मात्र यावर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी, विराट कोहली, अमिताभ बच्चन अशा प्रसिद्ध व्यक्तिमत्त्वांचे नाही तर एका वेगळ्याच व्यक्तीचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. भारतात यावर्षी सर्वात सर्च केल्या गेलेल्या व्यक्तींची यादी गुगलने प्रसिद्ध केली आहे. या यादीनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचे नव्हे तर एअरस्ट्राइकनंतर पाकिस्तानी विमानांनी केलेला हल्ला परतवून लावणाऱ्या विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांचे नाव भारतातून गुगलवर सर्वाधिक सर्च केले गेले आहे. अभिनंदन यांच्यानंतर लता मंगेशकर, युवराज सिंग, आनंद कुमार,  विकी कौशल, ऋषभ पंत, राणू मंडल, तारा सुतारिया, सिद्धार्थ शुक्ला, कोएना मित्रा यांची नावेही मोठ्या प्रमाणावर सर्च केली गेली.  भारतात गुगलवर सर्वाधिक सर्च झालेली व्यक्तिमत्त्वे  1) अभिनंदन वर्धमान ( Abhinandan Varthaman)2) लता मंगेशकर (Lata Mangeshkar)3) युवराज सिंग (Yuvraj Singh)4) आनंद कुमार (Anand Kumar)5) विकी कौशल (Vicky Kaushal)6) ऋषभ पंत (Rishabh Pant)7) राणू मंडल (Ranu Mondal)8)  तारा सुतारिया (Tara Sutaria)9) सिद्धार्थ शुक्ला (Siddharth Shukla)10) कोएना मित्रा (Koena Mitra) सरते वर्ष भारतीयांच्या दृष्टीने अनेक घटनांनी भरलेले राहिले. पुलवामा हल्ला आणि त्यानंतरची एअर स्ट्राइक, लोकसभा निवडणूक,  क्रिकेट विश्वचषकातील भारतीय संघाची कामगिरी, चांद्रयान-2 मोहिम, कलम 370 या घटना देशवासियांच्या मनात ठळकपणे नोंदवल्या गेल्या. मात्र या सर्वांमधून इंटरनेटवर भारतीयांची सर्वाधिक पसंती मिळाली ती क्रिकेटला. सर्वात मोठं सर्च इंजिन असलेल्या गुगलने सरत्या वर्षात इंटरनेटवर सर्वाधिक सर्च झालेल्या गोष्टींची यादी प्रसिद्ध केली आहे. त्यामध्ये भारतीयांना या वर्षात Cricket World Cup बाबत सर्वाधिक सर्च केले. त्यामुळेच गुगलच्या ओव्हरऑल कॅटॅगरीमध्ये या सर्चला पहिले स्थान मिळाले आहे. 

टॅग्स :googleगुगलAbhinandan Varthamanअभिनंदन वर्धमानLata Mangeshkarलता मंगेशकरRanu Mandalराणू मंडलflashback 2019फ्लॅशबॅक