'हे' आहेत सर्वाधिक पॉर्न फिल्म्स पाहणारे जगातील टॉप 10 देश; भारत-पाकिस्तानसह 'या' देशांचा समावेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 11:07 AM2021-07-21T11:07:46+5:302021-07-21T11:10:07+5:30

वेन्सन बोर्न फॉर ब्लू कोट नावाच्या एका रिसर्च इंस्टिट्यूटने 11 देशांत एक सर्व्हे केला. यात, सायबर सुरक्षेशी संबंधित धोका असतानाही अधिकांश कर्मचारी पॉर्न वेबसाइट्स पाहतात, असे दिसून आले आहे. जवळपास 19 टक्के चिनी कर्मचारी कामाच्या तासांत पॉर्न वेबसाइट्स पाहतात.  (Adult movies)

Top 10 countries where adult movies are watched the most | 'हे' आहेत सर्वाधिक पॉर्न फिल्म्स पाहणारे जगातील टॉप 10 देश; भारत-पाकिस्तानसह 'या' देशांचा समावेश

'हे' आहेत सर्वाधिक पॉर्न फिल्म्स पाहणारे जगातील टॉप 10 देश; भारत-पाकिस्तानसह 'या' देशांचा समावेश

Next

नवी दिल्ली - जगातील अनेक देशांत पॉर्न फिल्म्सवर पूर्णपणे बंदी आहे. मात्र, काही देश असेही आहेत, जेथे सर्वाधिक पॉर्न फिल्म्स पाहिल्या जातात. यात भारत, पाकिस्तान आणि चीनचाही समावेश आहे. सर्च इंजिन गूगलनुसार, पाकिस्तानात सर्वाधिक पॉर्न फिल्म्स पाहिल्या जातात. विशेष म्हणजे, तेथे पॉर्न फिल्म्स पाहण्यासाठी प्राण्यांच्या नावाने सर्च केले जाते. गाढव, कुत्रा, डुक्कर आदि नावाने येथे सर्च केले जाते. (Top 10 countries where adult movies are watched the most)

इंटरनेटवर पॉर्न फिल्म्स सर्च करणाऱ्या टॉप 5 देशांत पाकिस्ताननंतर इजिप्त, व्हिएतनाम, इराण आणि मोरोक्को देशांचा समावेश आहे. तर ऑफिसात बसून पॉर्न पाहण्याच्या बाबतीत चीन सर्वात पुढे आहे. येथे ऑफिसात काम करताना कर्मचारी सर्वाधिक पॉर्न पाहतात. 

वेन्सन बोर्न फॉर ब्लू कोट नावाच्या एका रिसर्च इंस्टिट्यूटने 11 देशांत एक सर्व्हे केला. यात, सायबर सुरक्षेशी संबंधित धोका असतानाही अधिकांश कर्मचारी पॉर्न वेबसाइट्स पाहतात, असे दिसून आले आहे. जवळपास 19 टक्के चिनी कर्मचारी कामाच्या तासांत पॉर्न वेबसाइट्स पाहतात. 

या बाबतीत दुसऱ्या स्थानावर मॅक्सिको आणि तिसऱ्या स्थानावर इंग्लंड आहे. इराणमध्ये पॉर्न पाहणाऱ्यांमध्ये तरुण वर्ग सर्वाधिक आहे. एका सर्व्हेत म्हणण्यात आले आहे, की पॉर्न फिल्म्स पाहणारा एक मोठा दर्शक वर्ग 35 वर्षांपेक्षा कमी वयाचा आहे. मॅक्सिकोमध्येही पॉर्न फिल्म्स पाहणारे अधिकांश लोक याच वयोगटातील आहेत.

पॉर्न फिल्म्स पाहणारे जगातील टॉप 10 देश असे -
1. पाकिस्तान
2. इजिप्त
3. व्हिएतनाम
4. इराण
5. मोरोक्को
6. भारत
7. सौदी अरेबिया
8. तुर्की
9. फिलीपिन्स
10. पोलंड

Web Title: Top 10 countries where adult movies are watched the most

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app