आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. बुक्करायसमुद्रम गावातील आंबेडकर गुरुकुल शाळेच्या स्वयंपाकघरात दीड वर्षाची मुलगी अक्षिता उकळत्या दुधाच्या भांड्यात पडली. अक्षिता तिची आई कृष्णावेणीसोबत स्वयंपाकघरात आली होती. तिथे विद्यार्थ्यांसाठी दूध थंड होण्यासाठी ठेवण्यात आलं होतं. त्यात पडल्याने अक्षिता गंभीर भाजली आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, आंध्र प्रदेशातील अनंतपूर जिल्ह्यातील बुक्करायसमुद्रम गावातील आंबेडकर गुरुकुल शाळेत ही धक्कादायक घटना घडली. व्हिडिओमध्ये १७ महिन्यांची अक्षिता तिच्या आईसोबत शाळेच्या स्वयंपाकघरात दिसते, तिची आई या शाळेत काम करते. विद्यार्थ्यांना देण्यासाठी तयार केलेलं गरम दूध थंड करण्यासाठी पंख्याखाली ठेवण्यात आलं होतं.
व्हिडिओमध्ये अक्षिता आणि तिची आई कृष्णावेणी थोड्या वेळासाठी स्वयंपाकघरातून बाहेर गेल्या आणि नंतर पुन्हा परतल्या. मुलगी तिच्या आईशिवाय स्वयंपाकघरात खेळत असलेली दिसत आहे, ती एका मांजरीचा पाठलाग करत होती. मांजर दुधाच्या भांड्याकडे आली होती. काही क्षणातच, मांजरीचा पाठलाग करताना अक्षिता दुधाच्या भांड्याजवळ पोहोचली, तिचा तोल गेला आणि त्यात पडली.
अक्षिताच्या ओरडण्याचा आवाज ऐकून तिची आई कृष्णावेणी धावत आल्या. त्यांनी तिला ताबडतोब भांड्यातून बाहेर काढलं आणि उपचारासाठी अनंतपूर सरकारी रुग्णालयात नेलं. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, अक्षिताला पुढील उपचारांसाठी कुर्नूल सरकारी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता समोर आलं आहे.
Web Summary : In Andhra Pradesh, a one-and-a-half-year-old girl, Akshita, died after falling into a pot of boiling milk in a school kitchen while chasing a cat. She was rushed to the hospital but succumbed to her injuries during treatment.
Web Summary : आंध्र प्रदेश के अनंतपुर जिले में एक दर्दनाक घटना घटी। डेढ़ साल की अक्षिता की उबलते दूध के बर्तन में गिरने से मौत हो गई। वह रसोई में एक बिल्ली का पीछा कर रही थी। अस्पताल में इलाज के दौरान उसने दम तोड़ दिया।