'परीक्षा होऊच नये म्हणून...' दिल्लीतील शाळेला मिळालेल्या बॉम्ब धमकी प्रकरणी मोठा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 08:53 IST2024-12-22T08:51:43+5:302024-12-22T08:53:17+5:30
काही दिवसापूर्वी दिल्लीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला बॉम्बेची धमकी मिळाली होती. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.

'परीक्षा होऊच नये म्हणून...' दिल्लीतील शाळेला मिळालेल्या बॉम्ब धमकी प्रकरणी मोठा खुलासा
काही दिवसापूर्वी दिल्लीतील व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूलला बॉम्बेची धमकी मिळाली होती. याप्रकरणी आता दिल्लीपोलिसांनी धक्कादायक खुलासा केला आहे. सुमारे तीन शाळांमध्ये ही धमकी त्या शाळांमधील विद्यार्थ्यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.
मिळालेल्या माहितीनुसार, बॉम्बच्या धमक्या मिळालेल्या शाळांपैकी एक म्हणजे व्यंकटेश्वरा ग्लोबल स्कूल, या शाळेला २८ नोव्हेंबर रोजी रोहिणी प्रशांत विहार पीव्हीआर मल्टिप्लेक्समध्ये रहस्यमय स्फोटानंतर एक दिवसापूर्वी धमकीचा ईमेल आला होता. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, हा ईमेल शाळेत शिकणाऱ्या भाऊ आणि बहिणींनी पाठवला होता. याचे कारण त्यांना परीक्षा पुढे ढकलण्याची इच्छा होती.
ब्राझीलमध्ये भीषण अपघात, ट्रक आणि बसची झाली धडक, ३८ जणांचा मृत्यू
समुपदेशनादरम्यान, अधिकाऱ्याने सांगितले की, दोन्ही विद्यार्थ्यांनी उघड केले की त्यांना ही कल्पना यापूर्वी शाळांना बॉम्बच्या धमक्यांच्या घटनांवरून मिळाली होती. त्यांच्या पालकांनी ताकीद दिल्यानंतर त्यांना बाहेर जाण्याची परवानगी देण्यात आली.
पोलिस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, रोहिणी आणि पश्चिम विहार येथील आणखी दोन शाळांनी त्यांच्या विद्यार्थ्यांनीच धमकीचे ईमेल पाठवले होते. या विद्यार्थ्यांना त्या दिवशी शाळा बंद हवी होती. म्हणून त्यांनी हा धमकीचा ई-मेल पाठवला.
गेल्या काही दिवसापासून दिल्लीत बॉम्बेच्या धमक्या वाढल्या आहेत. गेल्या ११ दिवसांत बॉम्बच्या धमकीमुळे दिल्लीतील १०० हून अधिक शाळांमध्ये गोंधळ उडाला आहे. या प्रकरणात पोलिसांना हे ईमेल व्हीपीएनद्वारे पाठवल्याचे समोर आले.यामुळे त्यांना गुन्हेगारांचा शोध घेणे कठीण होते. या वर्षी मे महिन्यापासून बॉम्बच्या धमकीच्या ५० हून अधिक ईमेलने केवळ शाळांमध्येच नाही तर दिल्लीतील रुग्णालये, विमानतळ आणि विमान कंपन्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण केले आहे.