शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

Babul Supriyo : बाबुल सुप्रियोंनी दिला खासदारकीचा राजीनामा; व्यक्त केल्या भावना, पंतप्रधान मोदींबद्दल म्हणाले....

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2021 16:36 IST

Babul Supriyo : बाबुल सुप्रियो यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

नवी दिल्ली - बाबुल सुप्रियो (Babul Supriyo) यांनी मंगळवारी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. काही दिवसांपूर्वीच सुप्रियो यांनी भाजपाशी (BJP) संबंध तोडल्यानंतर तृणमूल काँग्रेसमध्ये (TMC) प्रवेश केला होता. लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राजकारणात संधी दिल्याबद्दल तसंच पक्षात महत्त्वाच्या भूमिका दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), अमित शाह (Amit Shah) आणि वरिष्ठ नेत्यांचे आभार मानले आहेत. तसेच याबद्दल बोलताना ते भावूक झाल्याचं देखील पाहायला मिळालं. 

"भाजपासोबत राजकीय करिअरला सुरुवात केल्याने मी भावूक झालो आहे. मी पंतप्रधान, भाजपाध्यक्ष आणि अमित शाह यांचे आभार मानतो. त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला" असं म्हटलं आहे. तसेच सुप्रियो यांनी गेल्या महिन्यात भाजपामधून तृणमूल काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. आपण राजकारणातून संन्यास घेत असल्याने खासदारकीचा राजीनामा देणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं होतं."मी पूर्णपणे राजकारण सोडत आहे. जर मी पक्षाचा भाग नसेन तर ही जागा ठेवणं योग्य नाही असा विचार मी केला" असं देखील बाबुल सुप्रियो यांनी सांगितलं आहे. 

तृणमूलमध्ये सामील झाल्यानंतरही बाबुल सुप्रियोंनी ममता बॅनर्जींच्या बाजूने आणि भवानीपूरमध्ये भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल यांच्या विरोधात प्रचार करण्यास नकार दिला होता. 2021 च्या विधानसभा निवडणुकीत बाबुल सुप्रियो भाजपाचे स्टार प्रचारक होते. परंतु, केंद्रीय मंत्रीपद गेल्यानंतर त्यांनी तृणमूलमध्ये प्रवेश केला. टीएमसीमध्ये आल्यानंतर ते भवानीपूर ममता बॅनर्जींचा प्रचार करतील अशी आशा होती. पण, त्यांनी प्रचार करण्यास नकार दिला. 

तृणमूल भवनात पत्रकार परिषदेत एका प्रश्नाला उत्तर देताना बाबुल सुप्रियो म्हणाले होते की, भवानीपुरमध्ये ममता बॅनर्जींचा प्रचार करण्याची माझी इच्छा नाही. भवानीपूरमधील भाजपाच्या उमेदवार प्रियंका तिब्रेवाल माझ्या वकील होत्या. त्या एक लढवय्या महिला आहेत. माझ्या बाजुने त्यांनी अनेक खटले लढवले आहेत. मला त्यांच्या विरोधात प्रचार करण्याची इच्छा नाही.' त्यानंतर आता सुप्रियो यांनी खासदारकीचा राजीनामा दिला आहे. 

 

टॅग्स :Babul Supriyoबाबुल सुप्रियोNarendra Modiनरेंद्र मोदीAmit Shahअमित शाहBJPभाजपा