शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

'दहशतवाद्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा कठोर शिक्षा देणार'; बिहारमधून PM मोदींचा इशारा - Video पहा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 13:46 IST

PM Modi on Pahalgam Attack: बिहारमधल्या सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करणार असल्याचे सांगितले.

PM Narendra Modi on Pahalgam Attack: जम्मू काश्मीरच्या पहलगामध्ये दहशतवाद्यांनी केलेल्या भीषण हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदीबिहारच्या दौऱ्यावर आहेत. बिहारच्या मधुबनी येथे विविध कामांच्या उद्धघाटनाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी आले होते. यावेळी या सभेमध्ये आपल्या भाषणाच्या सुरुवातीला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही वेळ मौन बाळगून पहलगाममध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांना श्रद्धांजली वाहिली. देशाच्या आत्म्याला दुखावणाऱ्या दहशतवाद्यांना कोणत्याही किंमतीत सोडले जाणार नाही, असे पंतप्रधान मोदींनी आपल्या भाषणात स्पष्ट केले आहे.

जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी बिहारमध्ये सार्वजनिक व्यासपीठावर दिसले. या व्यासपीठावरून पंतप्रधान मोदींनी दहशतवाद्यांना कडक इशारा दिला. पंतप्रधानांनी यावेळी दहशतवाद्यांचा खात्मा करण्याबद्दल भाष्य केले. त्यामुळे आता हे स्पष्ट झालंय की पहलगाममधील दहशतवाद्यांच्या कारवायीनंतर सरकार आता त्यांना योग्य उत्तर देण्याच्या तयारीत आहे.

"पहलगाम हल्ल्याच्या घटनेमुळे संपूर्ण देश दुःखी आहे. सर्व पीडित कुटुंबियांच्या दुःखात सगळा देश त्यांच्यासोबत उभा आहे. ज्यांच्यावर उपचार चालू आहेत ते लवकर बरे व्हावेत यासाठीही सरकार सर्वतोपरी  प्रयत्न करत आहे. या दहशतवादी हल्ल्यात कुणी आपला मुलगा, भाऊ आणि जोडीदार गमावला. त्यातील प्रत्येक जण वेगवेगळे भाषिक होते. या सर्वांच्या मृत्यूवर आपल्या सर्वांचे दुःख, आक्रोश एकसारखा आहे. हा हल्ला फक्त पर्यटकांवरच झाला नाही तर देशाच्या शत्रूंनी भारताच्या आत्म्यावर हल्ला करण्याचे धाडस केले आहे. मी स्पष्ट शब्दात सांगतोय की, ज्यांनी हा हल्ला केला आहे त्या दहशतवाद्यांना आणि हा कट रचणाऱ्यांना त्यांनी कल्पनाही केली नसेल त्यापेक्षा जास्त कठोर शिक्षा दिली जाईल. शिक्षा मिळणारच. आता उरलेल्या दहशतवाद्यांनाही मातीत गाडण्याची वेळ आली असून त्यांचे उरलेले अड्डे नष्ट करण्याची वेळ आली आहे. १४० कोटी भारतीयांची इच्छाशक्ती दहशतवाद्यांच्या प्रमुखांचे कंबरडे मोडून ठेवणार आहे," असे पंतप्रधान मोदी म्हणाले.

"आज बिहारच्या मातीतून मी संपूर्ण जगाला सांगतोय की, भारत प्रत्येक दहशतवाद्याला आणि त्यांना पाठिंबा देणाऱ्यांना शोधून काढेल आणि कठोर शिक्षा देईल. आम्ही शेवटापर्यंत त्यांचा पाठलाग करू. दहशतवादामुळे भारताचा आत्मा कधीही तुटणार नाही. दहशतवाद्यांना शिक्षा झाल्याशिवाय राहणार नाही. न्याय मिळावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. मानवतेवर विश्वास ठेवणारा प्रत्येकजण आपल्यासोबत आहे. आमच्यासोबत उभे राहिलेल्या विविध देशांच्या लोकांचे आणि त्यांच्या नेत्यांचे मी आभार मानतो," असेही पंतप्रधान मोदी म्हणाले.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाNarendra Modiनरेंद्र मोदीBiharबिहारTerror Attackदहशतवादी हल्लाPakistanपाकिस्तानViral Videoव्हायरल व्हिडिओ