शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची वेळ आलीय का?; जाणून घ्या, तज्ज्ञ काय म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 14:05 IST

national lockdown : कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे.

ठळक मुद्देभारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे.

नवी दिल्ली : भारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. कोरोनावर मात करण्यासाठी देशातील अनेक राज्यांनी मिनी लॉकडाऊन तर काही राज्यांनी संपूर्ण लॉकडाऊन लागू केला आहे. तरीही कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत नाही. त्यामुळे पुन्हा देशव्यापी लॉकडाऊनची चर्चा होऊ लागली आहे. यावर तज्ज्ञांचे मत काय आहे? याबाबत 'आजतक'ने वृत्त दिले आहे, ते जाणून घेऊया...  (Time for a national lockdown to bend Covid curve? Here’s what experts have to say)

PHFI बंगळुरूचे प्राध्यापक गिरीधर बाबू यांचे म्हणणे आहे की, देशव्यापी लॉकडाऊन हा पर्याय आहे, असे वाटत नाही. कारण, आपण या व्हायरसचे संक्रमण होण्याच्या पद्धतीला समजू शकत नाही. एपिसेंटर्स काय आहे, हे आपण समजून घेतले पाहिजे. जसे की कर्नाटकात बंगळुरू आहे, म्हणून संपूर्ण राज्यात लॉकडाऊन लागू करणे योग्य होणार नाही. 

याचबरोबर, कंटेन्मेंट झोनही आपण यशस्वी करू शकलो नाही. लॉकडाऊन शहर आणि जिल्हास्तरावर ठिक आहे. कोरोना रुग्णांचे आकडे कसे कमी होतील, याकडे आपण लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनमुळे केवळ कोरोना रुग्णांच्या संख्येला आवर घालता येईल. पण कंटेन्मेंटमुळे खूप मदत होईल, असे प्राध्यापक गिरीधर बाबू यांनी सांगितले.

('केंद्र सरकारचे लसीकरण धोरणच भेदभावजनक आणि असंवेदनशील', सोनिया गांधींची टीका )

'लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो'लॉकडाऊन आपल्याला तयारीसाठी वेळ देतो, मात्र लॉकडाऊनसाठी सुद्धा तयारीची आवश्यकता आहे.आता ऑक्सिजनची दुप्पट मागणी वाढली आहे. कर्नाटकमध्ये लॉकडाऊनचा एक मोठा संकेत सुद्धा आहे. लॉकडाऊनच्या काळात लसीकरण मोहिमेचा वेग कमी होऊ शकतो. त्यामुळे रणनीतीमध्ये बदल आवश्यक आहे, असे कर्नाटक कोविड टास्क फोर्सचे सदस्य डॉ. विशाल राव यांचे मत आहे.

(CoronaVirus : 'भारतातील परिस्थिती विदारक', कोरोना संकटावर WHO च्या प्रमुखांनी व्यक्त केली चिंता)

लॉकडाऊनचा थेट परिणाम 'या' कामगारांवर पडतोनवी दिल्लीतील डॉ. शाहीद जमील यांचे म्हणणे आहे की, देशव्यापी लॉकडाऊन लागू केल्यामुळे काही उपयोग होणार नाही. ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या अधिक आहे. त्या ठिकाणी निर्बंध असले पाहिजे. देशव्यापी लॉकडाऊन केल्याने काय परिस्थिती निर्माण झाली होती. हे आपण पाहिलेच आहे. अशा वेळी लोकांच्या रोजी रोटीकडेही लक्ष दिले पाहिजे. लॉकडाऊनचा थेट परिणाम रोजंदारी करणाऱ्या कामगारांवर पडतो. याचबरोबर, देशात लसीकरणाचा वेग कमी झाला आहे. त्यातच नवा स्ट्रेन वेगाने पसरत आहे. यावेळी आरोग्य व्यवस्थेवर मोठा ताण पसरला आहे, असेही डॉ. शाहीद जमील यांनी सांगितले.

(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)

'लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली जाईल'गेल्यावेळी देशव्यापी लॉकडाऊन करण्यात आला होता. त्यावेळी कोरोना रुग्णांची संख्या कमी होती. लॉकडाऊन करण्याचीही एक पद्धत आहे. परंतु सरकारकडे लोकांना दिलासा देण्याचा दुसरा पर्याय नाही. लोकल लॉकडाऊनमुळे कोरोनाची चेन तोडली जाईल, यावर आपण विश्वास ठेवायला पाहिजे, असे मुंबईच्या केअर रेटिंग्सचे चीफ इकनॉमिस्ट मदन सबनवीस यांनी सांगितले.

("तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...)

दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्येत झपाट्याने वाढभारतात कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या झपाट्याने वाढत आहे. दररोज तीन लाखांच्यावर नव्या कोरोना रुग्णांची नोंद होत असल्याचे दिसून येत आहे. तसेच, देशात अनेक ठिकाणी आरोग्य सुविधांचा तुटवडा जाणवत आहे. त्यामुळे कोरोनावर मात करण्यासाठी अनेक देशांनी भारताच्या मदतीसाठी पुढाकार घेतला आहे. भारतात गेल्या २४ तासांत ३ लाख २३ हजार १४४ नवे रुग्ण तर २७७१ मृत्यूंची नोंद झाली. दिलासा देणारी बाब म्हणजे गेल्या २४ तासांत बरे होणाऱ्यांचे प्रमाणही ३२ हजार ५५५ ने वाढले आहे. दिवसभरात २,५१,८२७ रुग्ण बरे झाले आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसIndiaभारत