Double Mutant Division Explained : "तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...

By ऑनलाइन लोकमत | Published: April 26, 2021 02:02 PM2021-04-26T14:02:43+5:302021-04-26T14:05:51+5:30

What is Double Mutant : महाराष्ट्र आणि केरळ व्यतिरिक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही डबल म्यूटेंट आहेत, ज्याचा 5 ते10 टक्के कोरोना रुग्णांवर परिणाम दिसून येतो.

Double Mutant Division Explained: (What Are Three Sub Lineages Of Double Mutant Of Coronavirus, Know In Detail) | Double Mutant Division Explained : "तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...

Double Mutant Division Explained : "तीन प्रकारात विभागला 'डबल म्यूटेंट' व्हायरस", जाणून घ्या संपूर्ण माहिती...

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्रात सध्या जवळपास 70 टक्के रुग्ण कोरोना व्हायरच्या डबल म्यूटेंटमुळे संक्रमित झाले आहेत.

हैदराबाद : कोरोना व्हायरचा डबल म्यूटेंट बी.1.617 तीन  वेगवेगळ्या प्रकारात विभागला आहे. महाराष्ट्र आणि देशाच्या इतर काही भागात व्हायरसचे डबल म्यूटेंट प्रामुख्याने आढळले आहेत, असे देशातील वरिष्ठ शास्त्रज्ञांनी म्हटले आहे. दरम्यान, डबल म्यूटेंटमध्ये विभागल्यामुळे कोरोना संसर्गाची तीव्रता वाढणार का? हा सवाल आता महत्त्वाचा आहे, कारण जेव्हा व्हायरस रूप बदलतो तेव्हा बहुतेक वेळा तो पूर्वीपेक्षा धोकादायक असतो. (Double Mutant Division Explained: (What Are Three Sub Lineages Of Double Mutant Of Coronavirus, Know In Detail)

हैदराबादमधील शास्त्रज्ञ म्हणतात की, या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी अधिक संशोधन आवश्यक आहे. शास्त्रज्ञांनी सांगितले की, डबल म्यूटेंटच्या तीन प्रकारांची नावे अनुक्रमे बी.1.617.1, बी.1.617.2 आणि बी.1.617.3 आहेत. डबल म्यूटेंटच्या या तीन प्रकारांनी साथीच्या रोगाचा किती वाटा उचलला आहे, हे सांगणे योग्य नाही, असे सेंटर फॉर सेल्‍युलर अँड मॉलिक्युलर बायॉलजीच्या शास्त्रज्ञ दिव्या तेज सोपती म्हणाल्या. मात्र, त्यांनी डबल म्यूटेंट बी.1.167 तीन प्रकारात विभागला असल्याचे मान्य केले आहे.

दिव्या तेज सोपती यांनी सांगितले की, बी.1.167.1 हा विभाजित वर्गाचा सर्वात मोठा प्रकार आहे, ज्यामध्ये मूळ म्यूटेशनचे दोन घटक - एल452आर आणि ई484क्यू क्यू अस्तित्त्वात आहेत. तसेच, म्यूटेशनचा तिसरा घटक व्ही 382एल देखील त्यात आढळतो. याचबरोबर, बी.1.167.2 मध्ये ई484क्यू नाही आहे. तर बी.1.167.3 मध्ये मूलतः बी.1.596 चे घटक आहेत, संभाव्यत: म्यूटेशन एन:पी67एसच्यामुळे आले आहेत. 

(Coronavirus : ...म्हणून दुसऱ्या लाटेत कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला, CSIR नं सांगितलं कारण)

बी.1.167 हे15 हून अधिक म्यूटेशनमध्ये ओळखले जातात, परंतु दोन स्पाईक म्यूटेशनमध्ये एल 452 आर आणि ई 484 क्यूमुळे याने डबल म्यूटेंटचे रुप घेतले आहे. हे दोन्ही स्पाइक म्यूटेशन रोग प्रतिकारशक्तीवर हल्ला करण्यास सक्षम आहेत, ज्यामुळे त्यांची संसर्गजन्य क्षमता जास्त आहे. बी.1.617 चे काही सीक्वेन्स ई484क्यू म्यूटेशन नाही आहेत. याचा अर्थ असा की आता यापुढे डबल म्यूटेंट म्हटले जाऊ शकत नाही, असे दिव्या तेज सोपती यांनी सांगितले.

काय आहे ट्रिपल म्यूटेंट?
तर याला ट्रिपल म्यूटेंट म्हटले जाईल? या प्रश्नावर दिव्या तेज सोपती म्हणाल्या की, हे दिशाभूल करणारे आहे, कारण त्यात अनेक म्यूटेंट आहेत. याला ट्रिपल म्यूटेशन यासाठी म्हणतात की, दोन म्यूटेशनशिवाय त्याच्या स्पाइकमध्ये व्ही 382 एल देखील आहे. हे बी.1.167 चे रूप आहे, जे प्रामुख्याने महाराष्ट्र आणि इतर काही राज्यांमध्ये आढळते. आतापर्यंत ट्रिपल म्यूटेंटच्या व्यवहारावरून असे सूचित होते की ते कदाचित कमी धोकादायक आहे, असे दिव्या तेज सोपती यांनी सांगितले.

(CoronaVirus Live Updates : कोरोनाचा हाहाकार ! गेल्या २४ तासांत ३,५२,९९१ नवे रुग्ण, २८१२ जणांचा मृत्यू)

डबल म्यूटेंटसंदर्भात आतापर्यंत समोर आलेली माहिती
महाराष्ट्र आणि केरळ व्यतिरिक्त तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातही डबल म्यूटेंट आहेत, ज्याचा 5 ते10 टक्के कोरोना रुग्णांवर परिणाम दिसून येतो. महाराष्ट्रात सध्या जवळपास 70 टक्के रुग्ण कोरोना व्हायरच्या डबल म्यूटेंटमुळे संक्रमित झाले आहेत. तसेच, हेल्थ एक्सपर्ट्स महाराष्ट्रात तसेच देशातील इतर राज्यांमधील नवीन स्थानिक व्हेरिएंट्सला नवीन लाट जबाबदार असल्याचे म्हणत आहेत. दरम्यान, शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की संक्रमण वाढीचा दर, मृत्यू दर आणि गंभीर लक्षणे असलेल्या रुग्णांचे प्रमाण यामागील नवीनम्यूटेंट च्या कार्यक्षमतेची पुष्टी करण्यासाठी पुढील अभ्यास आवश्यक आहेत.
 

Web Title: Double Mutant Division Explained: (What Are Three Sub Lineages Of Double Mutant Of Coronavirus, Know In Detail)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.