जेव्हा रात्रीच्या काळोखात रस्त्याने फिरतो वाघ, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 17:49 IST2021-08-23T17:48:54+5:302021-08-23T17:49:39+5:30

Tiger viral video: आनंद महिंद्रा यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ किंवा इतर पोस्टची नेहमीच चर्चा होत असते.

tiger walks on the road in the dark of night, Anand Mahindra shared a video | जेव्हा रात्रीच्या काळोखात रस्त्याने फिरतो वाघ, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

जेव्हा रात्रीच्या काळोखात रस्त्याने फिरतो वाघ, आनंद महिंद्रांनी शेअर केला व्हिडिओ

आनंद महिंद्रा नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असतात. दररोज ते आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर काही ना काही पोस्ट टाकतच असतात. त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओ किंवा इतर पोस्टची नेहमीच चर्चा होत असते. अशाच एका पोस्टची सध्या चांगलीच चर्चा होत आहे. 

आनंद महिंद्रांनी त्यांच्या ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत एक वाघ रात्रीच्या अंधारात रस्त्याने फिरताना दिसत आहे. यावेळी रस्त्यावर असलेले लोक त्याचा व्हिडिओ घेत आहेत. आनंद महिंद्रा यांनी व्हिडिओ शेअर केल्यानंतर काही वेळातच तो व्हायरल झाला. या व्हिडिओवर युझर विविध कमेंट्स करत आहेत. दरम्यान, हा वाघ महाबळेश्वरच्या पंकगनीमध्ये दिसल्याचे त्या व्हिडिओमध्ये सांगण्यात येत आहे.

व्हिडिओमध्ये पाहता येईल की, एक वाघ रात्रीच्या काळोखात रस्त्याने फिरत आहे. त्या वाघामुळे वाहतुकीची कोंडीदेखील झालेली दिसत आहे. व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये आनंद महिंद्रा म्हणतात की, - फक्त आमची XUV रस्ता ब्लॉक करत नाही, वाघही रस्ता ब्लॉक करू शकतात. आतापर्यंत 2 लाखांहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ पाहिला आहे. 
 

Web Title: tiger walks on the road in the dark of night, Anand Mahindra shared a video