शहरं
Join us  
Trending Stories
1
"लोकसभेच्या ४८ जागांपैकी आम्ही..."; काँग्रेसचा मोठा दावा, विजयी आकडाच सांगितला
2
JP Nadda : "केजरीवालांचा पर्दाफाश, महिलांच्या अपमानावर गप्प का?"; जेपी नड्डा यांचं जोरदार प्रत्युत्तर
3
नरेंद्र मोदींच्या 'रोड शो' साठी मुंबई महापालिकेचा पैसा वापरला; संजय राऊतांचा आरोप
4
बाळासाहेबांच्या खोलीतील कधीही न ऐकलेला गौप्यस्फोट; देवेंद्र फडणवीस म्हणाले...
5
मुंबई इंडियन्स शेवटची मॅचही हरली! हार्दिक पांड्याने सगळे खापर टीमवर फोडले, म्हणतोय...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजात तेजी, Nestle च्या शेअर्समध्ये तेजी, JSW घसरला
7
६० नातेवाईक मिळून देवदर्शनाला गेलेले, बसला पहाटे भीषण आग, ८ जणांचा मृत्यू, २४ गंभीर
8
चिमुकल्याचा मृतदेह, रहस्यमय चिठ्ठी अन् 'ते' ७ शब्द; तांत्रिकाच्या मदतीनं अघोरी डाव?
9
किर्गिस्तानमध्ये स्थानिकांचा भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थ्यांविरोधात हिंसाचार; तीन विद्यार्थ्यांची हत्या
10
Infosys नं वाढवली ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांची संपत्ती; पत्नीनंही केली मोठी कमाई, जाणून घ्या
11
तिकडे मोदींची सभा, इकडे ठाकरे गटाचा मिहीर कोटेचांच्या कार्यालयात जोरदार राडा
12
मद्य धोरण प्रकरणात ‘आप’देखील आरोपी; ईडीने दाखल केले नवे आरोपपत्र, इतिहासातील पहिलीच घटना
13
सोढीने केला संसार त्याग?; 25 दिवसानंतर गुरुचरण सिंगची घरवापसी, दिली पहिली प्रतिक्रिया
14
आजचे राशीभविष्य १८ मे २०२४; जुनी येणी, प्रवास, अर्थ प्राप्तीसाठी चांगला दिवस
15
तुमच्या हातात विकसित भारत सोपवूनच जाईन, मुंबईला धक्का लागू देणार नाही: PM नरेंद्र मोदी
16
महागाई, बेरोजगारी, खोटेपणा हीच मोदी यांची गॅरंटी: खरगे, २ कोटी रोजगारांवरुन चढवला हल्लाबोल
17
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही: सोनिया गांधी
18
अतिरेकी हल्ल्यातील शहिदांचा अपमान करणाऱ्यांना जागा दाखवा: देवेंद्र फडणवीस
19
नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होणार, त्यांच्याकडून महाराष्ट्राच्या अपेक्षा: राज ठाकरे 
20
हीच भटकती आत्मा तुम्हाला सत्तेबाहेर बसवेल हे नक्की; शरद पवारांची सडकून टीका

महाराष्ट्रातून गेलेल्या 'त्या' नरभक्षक वाघाला आजन्म कारावासाची शिक्षा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2020 7:20 PM

चंद्रपूरहून मध्य प्रदेशात गेलेल्या वाघानं केली होती तिघांची शिकार

भोपाळ: कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पातील एका नरभक्षक वाघाला शनिवारी भोपाळमधील वन विहार राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं. या वाघानं चंद्रपूरहून मध्य प्रदेशातल्या बैतूल जिल्ह्यात प्रवेश केला होता. या वाघानं ऑक्टोबर २०१८मध्ये तीन जणांची शिकार केली होती. त्याची शिक्षा म्हणून आता वाघाला त्याचं उर्वरित आयुष्य पिंजऱ्यात काढावं लागेल.नरभक्षक वाघाला पिंजऱ्यात ठेवण्यात येणार असल्याची माहिती सुत्रांनी दिली. वाघाला जंगलात सोडण्यात आलं होतं. त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात राहण्यासाठी संधी दिल्या गेल्या. मात्र तो कायम मानवी वस्तीत शिरत होता. त्यामुळे त्याला एनटीसीएच्या नियमावलीनुसार माणसांसाठी धोकादायक घोषित करण्यात आलं. त्यामुळेच वाघाला आजन्म तुरुंगावासाची शिक्षा देण्याचा निर्णय घेण्यात आला.  डिसेंबर २०१८ मध्ये वाघ बैतूलमध्ये गेला होता. ११ डिसेंबर २०१८ रोजी बैतूल जिल्ह्यातल्या सारणीमधील नागरी वस्तीतून त्याला बाहेर काढण्यात आलं. त्यानंतर त्याला सातपुड्याच्या व्याघ्र संवर्धन प्रकल्पात सोडण्यात आलं. मात्र मानवी वस्तीजवळ जाण्याची सवय लागल्यानं तो पुन्हा नागरी वसाहतीजवळ पोहोचला. १० फेब्रुवारीला तो पुन्हा बेतूलच्या सारणी भागातील निवासी भागात गेला. तिथून त्याची रवानगी कान्हा व्याघ्र संवर्धन प्रकल्पात करण्यात आली. नरभक्षक वाघाचं वजन पाच वर्ष असून त्याचं वजन १८० किलो आहे. आता त्याला यापुढे वन विहार राष्ट्रीय उद्यानात ठेवण्यात येईल. वन विहारमध्ये सध्या १४ वाघ आहेत. मात्र त्यातील चारच दृष्टीस पडतात. बाकीचे वाघ धोकादायक आहेत. तर काही वाघ अनाथ आहेत. त्यांना दूर पिंजऱ्यात ठेवण्यात आलं आहे."येत्या काही दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढणार; पण..."...अन् आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधिताचा मृतदेह खड्ड्यात फेकला; व्हिडीओ व्हायरलरुग्णालयानं कोरोना चाचणी अहवाल येण्याआधीच मृतदेह ताब्यात दिला, 500 जणांच्या उपस्थितीत अंत्यविधी झाला अन्..."कोरोना संकट काळात मोदींसारखं नेतृत्त्व लाभणं हे देशाचं भाग्य"

टॅग्स :Tigerवाघ