तीन बहिणींचा एकाच मुलावर जीव जडला, तिघींनीही उचललं हे पाऊल
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 29, 2021 09:52 IST2021-09-29T09:47:33+5:302021-09-29T09:52:48+5:30
रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती.

तीन बहिणींचा एकाच मुलावर जीव जडला, तिघींनीही उचललं हे पाऊल
नवी दिल्ली - प्रेम आंधळं असतं, प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं, प्रेम प्रेम असतं, प्रेमात माणूस कुठल्याही थराला जातो... अशा कितीतरी सोयीस्कर व्याख्या प्रेमाच्या आपण ऐकल्या असतील, वाचल्या असतील. आता, अशीच एक प्रेमाची सत्यकथा समोर आली आहे. एकाच कुटुंबातील तीन मुलींचा, विशेषत: तीन सख्ख्या बहिणींचा जीव एकाच युवकावर जडला आहे. या प्रेमात तिन्हीही मुलींनी घर सोडून पलायन केले आहे.
रामपूरच्या अजीमनगर ठाणे परिक्षेत्रातील एका गावातील ही घटना असल्याची माहिती आहे. या गावातील तीन बहिणींचा एकाच तरुणावर प्रेम केलं. विशेष म्हणजे या तिघींनाही तो युवक एकच आहे, याची कल्पना नव्हती. याबाबत, जेव्हा कुटुंबीयांना माहिती झाली, तेव्हा कुटुंबीयांनी मुलींना त्या युवकांपासून दूर राहण्याचा सल्ला दिला. मात्र, याचा काहीही परिणाम झाला नाही. याउलट, संधी साधत तिन्ही मुली संबंधित युवकांसोबत पळून गेल्या. त्यानंतर, कुटुंबीयांनी धावाधाव सुरू केली असून मुलींसह मुलाचाही शोध सुरू आहे. मात्र, 8 दिवस उलटूनही अद्याप या चौघांचा पत्ता लागला नाही.
कुटुंबाची बदनामी होईल, म्हणून अद्याप पोलिसातही तक्रार दाखल करण्यात आली नाही. पळून गेलेल्या तीन मुलींपैकी 1 बालिक असून दोन मुली अल्पवयीन असल्याचे समजते. दरम्यान, गावातील ही घटना परिसरात चर्चेचा विषय बनली आहे. याबाबत, कुटुंबीयांनी लेखी तक्रार दिल्यास आम्ही नक्कीच तपास करू, असे पोलिसांचे म्हणणे आहे.