आईच्या अवैध संबंधातून तीन मुलींची गळा चिरून हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2018 16:28 IST2018-06-05T16:06:47+5:302018-06-05T16:28:03+5:30

बिहारमधल्या बांका जिल्ह्यात सोमवारी एक अमानुष घटना घडली आहे. घरात झोपलेल्या तीन मुलींची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

Three girls were raped and murdered by their daughter's illegal relation | आईच्या अवैध संबंधातून तीन मुलींची गळा चिरून हत्या

आईच्या अवैध संबंधातून तीन मुलींची गळा चिरून हत्या

बांका- बिहारमधल्या बांका जिल्ह्यात सोमवारी एक अमानुष घटना घडली आहे. घरात झोपलेल्या तीन मुलींची गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आज सकाळी या तिन्ही मुलींचे मृतदेह पोलिसांना सापडले. मृत मुलींचे वडील कामेश्वर यादव हे कामानिमित्त घराबाहेरच असतात. तर त्या मुलींची आईसुद्धा माहेरी गेली होती. 

लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, त्या तीन मुलींच्या आईचे एका परपुरुषाशी अवैध संबंध होते. आईचे असलेले हे अवैध संबंधच मुलींच्या जीवावर बेतल्याची आता दबक्या आवाजात चर्चा आहे. रिपोर्टनुसार, कादरा गावात घटनेदिवशी तिन्ही मुली घरात एकट्याच होत्या. मध्यरात्री काही तरुण त्यांच्या घरात घुसले आणि त्यांनी त्या मुलींवर अत्याचार केले. बलात्कारानंतर त्या मुलींची गळा चिरून हत्या केली. 

आजूबाजूच्या लोकांनी पोलिसांना सांगितलं की, आरोपीचे वडील आणि मृत मुलींच्या आईमध्ये अवैध संबंध होते. वडिलांच्या या अवैध संबंधांमुळे तरुण नाराज होता. त्यामुळेच आरोपी तरुणानं मित्रांच्या मदतीनं त्या तीन मुलींची हत्या केली. विशेष म्हणजे या मुलींची हत्या झाली, त्यावेळी घरात कोणीही नव्हते. आरोपीनं तिन्ही बहिणींचा खून करत हत्यारे तिथेच सोडून पोबारा केला. घटनास्थळी पोलिसांनी पंचनामा केल्यानंतर तिन्ही मुलींची बलात्कार करून हत्या केल्याची माहिती त्यांनी दिली. लवकरच आरोपींना अटक करू, असं आश्वासन एसपी चंदन कुशवाह यांनी दिलं आहे. पोलीस आरोपींच्या मागावर आहे. तिन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. 

Web Title: Three girls were raped and murdered by their daughter's illegal relation