PM मोदी CM योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; दीपक शर्मा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून आला मेसेज
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2021 19:59 IST2021-11-07T19:57:59+5:302021-11-07T19:59:21+5:30
PM Modi and CM Yogi : या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता.

PM मोदी CM योगींना बॉम्बनं उडवण्याची धमकी; दीपक शर्मा नावाच्या ट्विटर अकाउंटवरून आला मेसेज
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (Yogi Adityanath) यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्याची धमकी, 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर आली आहे. हा धमकीचा मेसेज आल्यानंतर, क्राइम ब्रांचकडे तपास सोपविण्यात आला आहे. दिवाळीच्या दिवशी 112 कंट्रोल रूमच्या ट्विटर हँडलवर दीपक शर्मा नावाच्या अकाउंटवरून मेसेज आला होता. (Threats to PM Modi and CM Yogi)
या मेसेजमध्ये पंतप्रधान मोदी आणि सीएम योगी यांच्यावर बॉम्बने हल्ला करण्यासंदर्भात लिहिण्यात आले होते. एवढेच नाही, तर या ट्विटमध्ये इतरही काही आक्षेपार्ह शब्दांचा वापर करण्यात आला होता.
जेसीपी क्राइम नीलाब्जा चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, धमकीचे ट्विट पाठवणाऱ्या ट्विटर हँडलसंदर्भात माहिती एकत्रित केली जात आहे. या प्रकरणाचा तपास क्राइम ब्रांचकडे सोपवण्यात आला आहे. जेसीपींच्या मते धमकी देणाऱ्याला लवकरच अटक करण्यात येईल.
यापूर्वीही, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विरोधात सोशल मीडियावरून अनेक वेळा धमक्या आणि आक्षेपार्ह कमेंट करण्यात आल्या आहेत. यानंतर पोलिसांनी गुन्हे दाखल करत आरोपींना जेलमध्येही पाठवले आहे. आता हे प्रकरणही पोलिसांनी गांभीर्याने घेतले आहे. क्राइम ब्रांचची अनेक पथकं याचा तपास करत आहेत.