शहरं
Join us  
Trending Stories
1
NATOबाबत अमेरिकेची मोठी चाल! इराण युद्धात मदत केली नाही; गंभीर परिणाम भोगावे लागणार, यादी तयार
2
जगातील ११ रिफायनरीमध्ये गुप्त हल्ले, भारतासह US मध्ये हाहाकार; मोदींचा दौरा टळला, योगायोग की कट?
3
इराणची कोंडी! अमेरिकेने समुद्रात उतरवला अवाढव्य ताफा; ३१ जहाजे ताब्यात घेतल्याने तणाव वाढला
4
"तो माझ्या छातीकडे टक लावून पाहायचा..."; नाशिक TCS प्रकरणात महिला टीम लीडरला आला विचित्र अनुभव
5
BMC: स्वच्छतेकडे दुर्लक्ष करणाऱ्या कंत्राटदारांवर कारवाई करा; महापालिका आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश  
6
"२०२९ विधानसभा निवडणुकीत पुन्हा पवार विरुद्ध पवार लढाई होऊ शकते", रोहित पवारांचे मत
7
Top Marathi News LIVE Updates: बारामतीत ११ वाजेपर्यंत २०.५९ टक्के तर राहुरीमध्ये १८.२२ टक्के मतदान
8
Gold Silver Price Today : बाजार उघडताच चांदीत ₹६,००० ची घसरण, सोनंही झालं स्वस्त; चेक करा तुमच्या शहरातील २४K, २२K, १८K चा भाव
9
करणीबाधेची भीती दाखवून महिलेवर अत्याचार; भोंदू बाबा महेशगिरीवर लासलगाव पोलिसांत अखेर गुन्हा दाखल!
10
Mumbai Mithi River: ‘मिठी’ नदीच्या सफाईचा अहवाल द्या! स्थायी समिती अध्यक्षांच्या प्रशासनाला सूचना 
11
दमदार फॉर्म, कुशल कप्तानी, तरीही हैदराबाद ईशान किशनला कर्णधारपदावरून हटवणार, कारण काय?   
12
अमराठी वाहनचालकांसाठी मराठी संवाद अनिवार्य; प्रभावी अंमलबजावणीसाठी विशेष बैठक
13
१४ चौकार, ५ षटकार... लॉरा वूल्फार्टचा शतकी धमाका; स्मृती मानधानाच्या विश्वविक्रमाशी बरोबरी
14
Mumbai: 'हाजी नुराणी चाळवासीयांनो, उद्यापर्यंत घरे रिकामी करा! नाही तर...' एमएमआरडीएचा इशारा 
15
अक्कलकोटच्या स्वामींचा लाडका शिष्य: योगिराज शंकर महाराज पुण्यतिथीनिमित्त विशेष लेख
16
रितेश देशमुखसोबत सीन ते परदेशातून आलेली ॲक्शन टीम; 'राजा शिवाजी'मध्ये भूमिका साकारताना रामचंद्र गावकर भारावला
17
Share Market: उघडताच जोरदार आपटला शेअर बाजार! Sensex ७०० अंकांनी खाली, 'या' शेअर्स मध्ये मोठी घसरण
18
Stray Dogs: भटक्या श्वानांच्या घरासाठी पालिकेला कोणी जागा देता का?
19
MBA नंतर २५ लाखांची नोकरी सोडून चालवू लागला ओला कार; ३ वर्षात ६.५० लाख कमाई, खरेच शक्य आहे?
20
'या' लोकांना दर महिन्याला ₹१०,००० पेन्शन देण्याचा विचार करतेय सरकार; कोणती आहे योजना, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री

धमकी देऊन केली शेतीची रजिस्ट्री
नागपूर : धमकी देऊन दुसऱ्याची शेती आणि प्लॉटची आपल्या नावाने रजिस्ट्री करणाऱ्या पाच आरोपींविरुद्ध गिट्टीखदान पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
विजयलक्ष्मी अशोकराव लोहकरे (४१) रा. गणपतीनगर, प्लॉट नं. ६६, गोधनी रोड, झिंगाबाई टाकळी यांची सावरमेंढा येथे शेती आणि १५०० चौरस फूटांचा प्लॉट आहे. विजयलक्ष्मी यांची परिस्थिती बिकट असल्यामुळे त्यांनी आरोपी रमेश विनायक पोटभरे (४०), नरेंद्र खंडुजी चांभारे (४०) रा. डोये ले आऊट, पुरुषोत्तम गंगाधर भगतकर रा. गोळीबार चौक, टिमकी, अभय विनायक सावरकर रा. पांडे ले आऊट, खामला, भीमराव मलकाय रा. सावरमेंढा यांच्याकडून १० टक्के व्याजाने ५ लाख रुपये घेतले. आरोपींनी त्यांच्या संपत्तीचे मूळ कागदपत्र धमकावून जबरदस्तीने आपल्याकडे गहाण ठेवले. विजयलक्ष्मी यांनी आरोपींना १८ लाख रुपये व्याजासह परत केले. परंतु आरोपींनी जबरदस्तीने त्यांची शेती, प्लॉट आपल्या नावाने रजिस्ट्री करून घेतला. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून गिट्टीखदान पोलिसांनी आरोपींविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.