निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2025 16:06 IST2025-11-26T15:43:33+5:302025-11-26T16:06:57+5:30

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर प्रक्रियेदरम्यान, निवडणूक आयोगाने पश्चिम बंगाल पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षेचे आवाहन केले आहे. निवडणूक आयोगाने ४८ तासांच्या आत केलेल्या कारवाईचा अहवाल मागितला आहे.

Threat to election officials, Election Commission writes to Bengal Police Reminds them of the incident | निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली

निवडणूक अधिकाऱ्यांना धोका, निवडणूक आयोगाने बंगाल पोलिसांना पत्र लिहिले; त्या घटनेची आठवून करून दिली

पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या एसआयआर दरम्यान, निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिसांना पत्र लिहून निवडणूक अधिकाऱ्यांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली आहे. निवडणूक आयोगाने कोलकाता पोलिस आयुक्तांना पत्र लिहून SIR ड्युटीवर तैनात असलेल्या निवडणूक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची सुरक्षा सुनिश्चित करण्यास सांगितले आहे. 

२४ नोव्हेंबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांच्या कार्यालयाच्या सुरक्षेत भंग झाल्याचे समोर आले आहे. याशिवाय, मुख्य निवडणूक आयुक्त, अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी, संयुक्त मुख्य निवडणूक अधिकारी आणि उपमुख्य निवडणूक अधिकारी यांच्या सुरक्षेतही तडजोड करण्यात आली आहे, असेही पत्रात म्हटले आहे.

FBI चे प्रमुख काश पटेल यांनी गर्लफ्रेंडला पुरवली कमांडो सुरक्षा, नोकरी जाण्याची चर्चा; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले...

निवडणूक आयोगाने या घटनेची आधीच दखल घेतली आहे. मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची सुरक्षा देणे आवश्यक आहे. त्यांच्या कार्यालय आणि निवासस्थानावर सुरक्षा मजबूत केली पाहिजे. एसआयआर प्रक्रिया आणि डेटा संरक्षित करण्यासाठी पुरेसे सुरक्षा उपाय देखील केले पाहिजेत. निर्देशानंतर उचललेल्या पावलांची माहिती ४८ तासांच्या आत द्यावी अशी विनंती निवडणूक आयोगाने केली आहे.

सोमवारी बीएलओ हक्क संरक्षण समितीच्या शेकडो सदस्यांनी कॉलेज स्क्वेअरपासून सीईओ कार्यालयापर्यंत मोर्चा काढला आणि धरणे आंदोलन केले. पोलिस मानवी अडथळ्याप्रमाणे पहारा देत असतानाही, काहींनी गेट तोडण्याचा प्रयत्न केल्याने परिस्थिती तणावपूर्ण बनली. गर्दीत काही निदर्शकांनी कार्यालयात घुसून धरणे आंदोलन सुरू केले. 

सोमवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास केएमसी नगरसेवक सजल घोष यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांचा एक गट घोषणाबाजी करत घटनास्थळी पोहोचला. त्यांनी सत्ताधारी तृणमूल काँग्रेसवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमकावून चालू असलेल्या एसआयआर प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला.

Web Title : चुनाव आयोग ने बंगाल पुलिस को लिखा पत्र, अधिकारियों की सुरक्षा पर चिंता

Web Summary : चुनाव आयोग ने पश्चिम बंगाल में चुनाव अधिकारियों की सुरक्षा पर चिंता जताई और कोलकाता पुलिस से एसआईआर ड्यूटी के दौरान सुरक्षा सुनिश्चित करने का आग्रह किया। आयोग ने मुख्य चुनाव आयुक्त के कार्यालय में सुरक्षा उल्लंघन का हवाला दिया और कार्यालयों और आवासों पर सुरक्षा बढ़ाने की आवश्यकता पर जोर दिया। विरोध प्रदर्शनों के बाद 48 घंटों के भीतर उठाए गए कदमों पर रिपोर्ट मांगी गई है।

Web Title : Election Commission Concerned About Officer Safety, Writes to Bengal Police

Web Summary : Election Commission expressed concern over election officer safety in West Bengal, urging Kolkata police to ensure security during SIR duty. The Commission cited a security breach at the Chief Election Commissioner's office and emphasized the need for enhanced protection at offices and residences. It sought a report on implemented measures within 48 hours following protests.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.