धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा, या राज्यानं घेतला कठोर निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2025 17:02 IST2025-03-08T17:01:41+5:302025-03-08T17:02:54+5:30
Madhya Pradesh News: मध्य प्रदेश सरकारने धर्मांतर करवणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. राज्यामध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे.

धर्मांतर करवणाऱ्यांना होणार फाशीची शिक्षा, या राज्यानं घेतला कठोर निर्णय, मुख्यमंत्र्यांनी केली घोषणा
मध्य प्रदेश सरकारने धर्मांतर करवणाऱ्यांविरोधात कठोर पाऊल उचललं आहे. राज्यामध्ये धर्मांतर करवणाऱ्यांना आता फाशीची शिक्षा दिली जाणार आहे. मध्य प्रदेशचेमुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी ही घोषणा केली आहे. या निर्णयाबाबत माहिती देताना मोहन यादव म्हणाले की, धार्मिक स्वातंत्र्य अधिनियमाच्या माध्यमातून आम्ही जे धर्मांतर करवतील, त्यांच्यासाठीही फाशीची शिक्षा देण्याची तरतूद करत आहोत.
त्यांनी पुढे सांगितले की, धर्मांतर आणि गैरवर्तनाच्या कुठल्याही व्यवस्थेविरोधात सरकारने संकल्प केला आहे. आम्ही समाजामध्ये या कुप्रथांना प्रोत्साहित करणार नाही. तसेच लहान मुलींवर अत्याचार करणाऱ्यांविरोधातही सरकारची सक्त भूमिका आहे. त्यामुळे आम्ही फाशीच्या शिक्षेची तरतूद केली आहे. आमचं सरकार जबरदस्तीने आणि फसवून दुराचार करणाऱ्यांना सोडणार नाही. आम्ही कुठल्याही परिस्थितीत अशा व्यक्तींना जिवंत राहण्याचा अधिकार देणार नाही.