'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 22:52 IST2025-09-27T22:51:09+5:302025-09-27T22:52:23+5:30
हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत."

'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी बरेलीमध्ये उपद्रव करणाऱ्यांना पुन्हा एकदा कठोर शब्दात इशारा दिला आहे. "आम्ही सर्व समाज, जातींच्या कल्याणासाठी कार्यरत आहोत. अनुसूचित जाती, मागास सर्वांना सन्मान दिला. 'सबका साथ, सबका विकास' हा आमचा मूलमंत्र आहे. असे असतानाही काहींना विकास चांगला वाटत नाही. ते तालिबानी व्यवस्था आणि दारुल इस्लामवक विश्वास ठेवतात. मी त्यांना सागू इच्छितो की, अशी व्यवस्था 'जन्नत'मध्येही (स्वर्गात) पूर्ण होणार नाहीत. यासाठी सर्वप्रथम 'जहन्नुम'मध्ये (नरक) जावे लागेल, असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी म्हटले आहे. ते शनिवारी श्रावस्ती येथे एक जनसभेत बोलत होते.
...अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत -
योगी पुढे म्हणाले, "हा नव्या भारताचा नवा उत्तर प्रदेश आहे. याला 'सबका साथ, सबका विकास' माहित आहे. याच बरोबर, उपद्रवी आणि माफियांना कसे वठणीवर आणायचे हेही माहीत आहे." हिंदू सणांदरम्यान अशांतता निर्माण करणाऱ्यांसंदर्भात बोलताना ते म्हणाले, "सण म्हणजे उत्साह आणि एकतेची वेळ. हिंदू कुटुंब आपली संपत्ती खर्चून समाजाच्या आनंदात सहभागी होतात. भेदभाव करत नाहीत. अशा वेळी रस्त्यावरील प्रदर्शन आणि उपद्रव खपवून घेतले जाणार नाहीत."
अशी कारवाई केली जाईल की, पुढच्या पिढ्यांनाही लक्षात राहील -
"श्रद्धा हा अंतःकरणाचा विषया आहे, प्रदर्शनाचा नाही. श्रद्धेच्या नावाखाली तोडफोड, जाळपोळ अथवा पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांना सोडले जाणार नाही. अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर अशी कारवाई केली जाईल की, त्यांच्या पुढच्या पिढ्यांनाही ते लक्षात राहील.