रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2026 10:40 IST2026-04-07T10:39:25+5:302026-04-07T10:40:37+5:30

मेरठचा रहिवासी असलेला साकिब ऊर्फ ‘डेविल’ आपल्या साथीदारांसह उत्तर भारतात रेल्वे अपघातांची मोठी मालिका घडवून आणण्याच्या तयारीत होता.

'Those' terrorists were going to make life difficult for passengers by placing gas cylinders on the railway tracks; ATS's big revelation! | रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!

रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!

उत्तर प्रदेश एटीएसने गेल्या आठवड्यात अटक केलेल्या चार दहशतवाद्यांच्या चौकशीतून एक अतिशय धक्कादायक आणि अंगावर शहारे आणणारा खुलासा झाला आहे. मेरठचा रहिवासी असलेला साकिब ऊर्फ ‘डेविल’ आपल्या साथीदारांसह उत्तर भारतात रेल्वे अपघातांची मोठी मालिका घडवून आणण्याच्या तयारीत होता. विशेष म्हणजे, या दहशतवाद्यांना पाकिस्तानी हँडलर्सनी रेल्वे ट्रॅकवर गॅस सिलेंडर ठेवून रेल्वे उडवून देण्याचे विशेष प्रशिक्षण दिल्याचे समोर आले आहे. या खुलाशानंतर यंत्रणांचे धाबे दणाणले असून, गेल्या दीड वर्षातील सर्व संशयास्पद रेल्वे अपघातांची पुनर्तपासणी सुरू करण्यात आली आहे.

पाकिस्तानी हँडलरकडून व्हिडिओ ट्रेनिंग

एटीएसच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, साकिब आणि त्याच्या टोळीत १० हून अधिक तरुणांचा समावेश होता. या तरुणांना केवळ शस्त्रे चालवण्याचेच नाही, तर रेल्वेला लक्ष्य करण्याचे तंत्रही शिकवण्यात आले होते. पाकिस्तानी हँडलर या दहशतवाद्यांना व्हिडिओ पाठवून रेल्वे ट्रॅकवर अडथळे कसे निर्माण करायचे आणि गॅस सिलेंडरचा वापर करून मोठा स्फोट कसा घडवायचा, याचे धडे देत होते. या ट्रेनिंगचा वापर करून काही ठिकाणी रेल्वे रुळांवर सिलेंडर ठेवण्याचे प्रयत्नही झाले होते, अशी कबुली आरोपींनी दिली आहे.

दीड वर्षातील रेल्वे अपघातांची होणार कुंडली गोळा

साकिब आणि त्याच्या टोळीच्या अटकेनंतर एटीएसने आता आपला मोर्चा गेल्या १८ महिन्यांत उत्तर प्रदेशसह इतर राज्यांत झालेल्या रेल्वे घटनांकडे वळवला आहे. जिथे जिथे रुळांवर संशयास्पद वस्तू किंवा सिलेंडर सापडले होते, त्या सर्व ठिकाणचा मोबाइल टॉवर डेटा आणि या दहशतवाद्यांचे लोकेशन तपासले जात आहे. या दहशतवाद्यांचा त्या अपघातांमध्ये थेट सहभाग होता का? याची शहानिशा आता युद्धपातळीवर सुरू आहे.

साकिबला शस्त्रांची हौस, क्यूआर कोडने यायचा पैसा

अटक करण्यात आलेल्या अरबाब, विकास आणि लोकेश यांनी चौकशीत सांगितले की, साकिबला अत्याधुनिक शस्त्रास्त्रांची प्रचंड ओढ होती. हे नेटवर्क चालवण्यासाठी त्यांना परदेशातून ‘क्यूआर कोड’द्वारे पैसे पाठवले जात होते. या पैशातून साकिब मोठ्या प्रमाणावर शस्त्र खरेदी करण्याच्या बेतात होता. रेल्वे स्थानके, सरकारी इमारती आणि बड्या नेत्यांची रेकी करून ही माहिती पाकिस्तानी हँडलर्सना पुरवली जात होती.

दुबईतून आकिबचा व्हिडिओ:‘मी देशभक्त आहे!’

या संपूर्ण प्रकरणात साकिबचा संबंध दुबईत बसलेल्या आकिबशी असल्याचे एटीएसला संशय आहे. गेल्या वर्षी साकिब ऊर्फ डेविल आणि आकिब यांचा एक व्हिडिओ कॉल व्हायरल झाला होता, ज्यात पाकिस्तानी हँडलरसोबत एके-४७ आणि हँड ग्रेनेड दिसत होते. आता या प्रकरणात नाव आल्यानंतर आकिबने दुबईतून एक व्हिडिओ जारी करत स्वतःचा बचाव केला आहे. "मी दहशतवादी नसून सच्चा देशभक्त आहे. ज्यांना पकडले आहे त्यांची चौकशी करा, पण निष्पापांना गोवू नका," अशी सफाई त्याने दिली आहे. मात्र, एटीएसचे धागेदोरे थेट आकिबपर्यंत पोहोचल्याने त्याचे टेन्शन वाढले आहे.

Web Title : आतंकवादियों ने गैस सिलेंडर से ट्रेन हमलों की योजना बनाई; एटीएस ने साजिश का पर्दाफाश किया

Web Summary : एटीएस ने पाकिस्तानी संचालकों द्वारा प्रशिक्षित आतंकवादियों द्वारा गैस सिलेंडरों का उपयोग करके ट्रेन दुर्घटनाओं को अंजाम देने की साजिश का पर्दाफाश किया। उनका उद्देश्य व्यापक अराजकता पैदा करना था। पिछली घटनाओं की जांच चल रही है, जिसमें क्यूआर कोड के माध्यम से संभावित लिंक और फंडिंग स्रोतों का पता चल रहा है। दुबई स्थित एक संदिग्ध ने संलिप्तता से इनकार किया।

Web Title : Terrorists Planned Train Attacks with Gas Cylinders; ATS Exposes Plot

Web Summary : ATS uncovered a plot by terrorists, trained by Pakistani handlers, to cause train accidents using gas cylinders. They aimed to create widespread chaos. Investigations into past incidents are underway, revealing potential links and funding sources through QR codes. A Dubai-based suspect denies involvement.