'त्या' दोघी बँकॉकवरून घेऊन आल्या कोट्यवधी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा; विमानतळावर उतरताच...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2025 18:31 IST2025-04-06T18:30:08+5:302025-04-06T18:31:07+5:30

सीमा शुल्क विभागाने दोन महिलांकडून तब्बल ३७ किलो हायड्रोपोनिक गांजा जप्त केला. महिलांच्या बॅगेत ४२ कापडाच्या पिशव्यांमध्ये तो भरलेला होता. पण, अधिकाऱ्यांनी या महिलांना कसं पकडलं?

'Those' duo brought hydroponic marijuana worth crores of rupees from Bangkok; As soon as they landed at the airport... | 'त्या' दोघी बँकॉकवरून घेऊन आल्या कोट्यवधी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा; विमानतळावर उतरताच...

'त्या' दोघी बँकॉकवरून घेऊन आल्या कोट्यवधी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा; विमानतळावर उतरताच...

दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सीमा शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी मोठी कारवाई केली. बँकॉकवरून आलेल्या विमानातून दोन महिला उतरल्या. या महिला टर्मिनल ३ वर पोहोचल्या होत्या. त्याचवेळी अधिकाऱ्यांची त्यांच्यावर नजर पडली. त्यांना थांबवण्यात आले आणि शंका खरी ठरली. अधिकाऱ्यांनी जेव्हा त्यांची आणि त्यांनी सोबत आणलेल्या सामानाची झाडाझडती घेतली, तेव्हा सगळेच चक्रावून गेले. कारण त्यात जवळपास ३९ कोटी रुपयांचा हायड्रोपोनिक गांजा आढळून आला. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

ज्या दोन महिलांकडे हा गांजाचा सापडला, त्या थायलंडच्या आहेत. २९ मार्च २०२५ रोजी त्या बँकॉकवरून निघाल्या होत्या. फ्लाईट टीजी ३२३ ने त्या दिल्लीत पोहोचल्या. 

अधिकाऱ्यांना शंका आली 

दोन्ही महिला टर्मिनल ३ जवळ आल्या. त्यावेळी अधिकाऱ्यांनी त्यांना ग्रीन चॅनलजवळ थांबवले. त्यांच्याजवळ असलेल्या सामानाची एक्स-रे तपासणी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या बॅग तपासण्यात आल्या. 

तपासणी करताना एक ग्रे आणि दुसरी ग्रीन रंगाच्या बॅगेत ४२ पाऊच आढळून आले. ज्यावेळी या पाऊचमधील पदार्थाची तपासणी करण्यात आली. तेव्हा त्यात हायड्रोपोनिक गांजा असल्याचे स्पष्ट झाले. या गांजाचे वजन ३६ किलो आणि ८९३ ग्राम इतके आहे. 

दोन्ही महिलांना अटक, तपास सुरू

दोन्ही महिलांवर एनडीपीएस कायदा १९८५ च्या कलम ८ चे उल्लंघन केल्याप्रकरणी, तसेच कायद्यातील कलम २०, २३ आणि २९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला. दोन्ही महिलांना ३० मार्च रोजी सायंकाळी अटक करण्यात आले. 

भारतात हायड्रोपोनिक गांजाला म्हणतात ओजी

या महिलांकडे सापडलेला हायड्रोपोनिक गांजा भारतात ओजी नावाने ओळखला जातो. गेल्या काही वर्षात या गांजाची भारतात आवक वाढली आहे. अनेकदा सीमाशुल्क आणि इतर तपास यंत्रणांनी मोठ्या प्रमाणात हा जप्त केल्याच्या कारवाया केल्या आहेत. 

हायड्रोपोनिक गांजाची शेती मातीत नव्हे, तर भरपूर पोषक तत्व असलेल्या पाण्यात केली जाते. थायलंडमध्ये हे लोकप्रिय आहे. कारण तिथे या मादक पदार्थाचे सेवन करणे कायद्याने गुन्हा नाही.

Web Title: 'Those' duo brought hydroponic marijuana worth crores of rupees from Bangkok; As soon as they landed at the airport...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.