शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
3
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
4
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
5
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
6
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
7
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
8
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
9
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
10
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
11
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
12
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
13
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
14
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
15
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
16
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
17
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
18
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
19
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
20
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
Daily Top 2Weekly Top 5

यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2025 17:37 IST

यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला.

केंद्रीय गृहमंत्री तथा भाजप नेते अमित शाह यांनी अररियाच्या फारबिसगंज हवाई पट्टी मैदानात कार्यकर्त्यांना संबोधित केले. यावेळी, बिहारच्या जनतेला यावेळी चार दिवाळ्या साजऱ्या करण्याच्या आहेत, असे शाह यांनी म्हटले आहे. ते म्हणाले, एनडीएला पुन्हा एकदा दोनृ तृतियांश बहुमताने विजयी केल्यास आम्ही बिहारच्या या पावन भूमीवरून एक-एक घुसखोर शोधून काढू. दरम्यान शाह यांनी 2025 च्या विधानसभा निवडणुकीसाठी 160 प्लसचे टार्गेटही सेट केले आहे. यावेळी त्यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि राजद नेते तेजस्वी यादव यांच्यावरही हल्ला चढवला.

यावेळी बिहारमध्ये 4 दिवाळ्या -चार दिवाळ्या कोणत्या याचा उल्लेख करत, शाह म्हणाले, पहिली दिवाळी प्रभु श्रीराम अयोध्येत परतले त्या स्मरणार्थ, दुसरी बिहारच्या 75 लाख महिलांना पंतप्रधान मोदींनी स्वयंरोजगारासाठी दिलेल्या 10 हजार रुपयांच्या मदतीसाठी, तिसरी जीएसटी सुधारणांमुळे 395 हून अधिक वस्तूंच्या किमती कमी झाल्याबद्दल आणि चौथी बिहारमध्ये एनडीए-भाजप सरकार स्थापन झाल्यावर. शाह पुढे म्हणाले, “दोन तृतियांश बहुमताने सरकार स्थापन होताच प्रत्येक घुसखोराला बिहारमधून हुसकावून लावू.” यावेळी केवळ स्वदेशी वस्तूंची खरेदी करण्याचे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

शाह यांनी लालू प्रसाद यादव आणि काँग्रेसवर भष्टाचाराचे आरोप केले, तसेच, गेल्या 11 वर्षांत मोदी सरकारवर भ्रष्टाचाराचा एकही आरोप विरोधक करू शकले नाही, असेही शाह म्हणाले. एवढेच नाही तर, घुसखोरांनाही मतदानाचा हक्क मिळावा, अशी राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांची इच्छा आहे. मात्र, घुसखोरांना मतदानाचा हक्क कधीच मिळणार नाही, हा आमचा संकल्प आहे,” असेही शाह यावेळी म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Bihar: Shah sets NDA target, slams Rahul, Tejashwi over infiltrators.

Web Summary : Amit Shah targeted 160+ seats for NDA in Bihar's 2025 election. He promised to expel infiltrators and criticized Rahul Gandhi and Tejashwi Yadav, accusing them of supporting voting rights for infiltrators.
टॅग्स :Amit Shahअमित शाहBJPभाजपाRahul Gandhiराहुल गांधीcongressकाँग्रेसBiharबिहार