शहरं
Join us  
Trending Stories
1
राजस्थान रॉयल्सचे QUALIFIER 1चे स्वप्न भंगणार? पंजाब किंग्सकडून हरल्याने समीकरण बदलले
2
दोन पक्ष संपवण्याच्या प्रयत्नात भाजपलाच संपवलं; आदित्य ठाकरेंचा फडणवीसांना टोला 
3
इंडिया आघाडीचे सरकार स्थापन झाल्यावर बाहेरुन पाठिंबा देणार; ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
4
घाटकोपर होर्डिंग्ज एजन्सीची मान्यता तत्काळ रद्द करून काळ्या यादीत टाका; अंबादास दानवेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र
5
"दिल टूट गया है..", कॉमेडियन श्याम रंगीलाचा उमेदवारी अर्ज फेटाळला, वाराणसीतून लढवता येणार नाही निवडणूक!
6
'मुस्लिमांशी घट्ट नाते आहे' म्हणणारे पंतप्रधान मोदी मुस्लीम द्वेषावरच भाषण देतात, नाना पटोलेंची टीका
7
पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर RRच्या फलंदाजांची धडपड; रियान पराग एकटा लढला
8
एकहाती सत्तेपेक्षा 'मिलीजुली' सरकार देशहिताचं, जे सगळ्यांची 'मन की बात' ऐकेल; आदित्य ठाकरेंनी मांडला वेगळाच मुद्दा
9
"अरविंद केजरीवाल यांच्यासाठी माझ्याकडे एक वाईट बातमी आहे..."; काय म्हणाले अमित शाह?
10
Anil Desai, Congress: ठाकरे गटाच्या उमेदवाराशी आधी काँग्रेस कार्यकर्ते भिडले, मग खांद्यावरून घेऊन नाचले; गैरसमजातून वाद, नेमकं काय घडलं?
11
झारखंडचे मंत्री आलमगीर आलम यांना ईडीकडून अटक, सचिवाच्या नोकराच्या घरी सापडली होती कोट्यावधींची रोकड!
12
धक्कादायक! वाहन चालवत असतानाच फार्मासिस्टचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
13
राहुल गांधींच्या पत्रिकेत पंतप्रधान बनण्याचा योग नाही; भाजप नेत्याचा खोचक टोला...
14
Neeraj Chopra : नीरज चोप्राने आणखी एक सुवर्णपदक जिंकले, महाराष्ट्राच्या पाटीलची 'उत्तम' कामगिरी
15
पती पत्नीचा असाही 'व्यवसाय'! ती ट्रक चालकांना जाळ्यात फसवायची अन् तो उकळायचा पैसे
16
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
17
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
18
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
19
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
20
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं

चोरट्यांनी डान्स करत पाच दुकानांची केली लूट

By ऑनलाइन लोकमत | Published: July 11, 2018 2:28 PM

दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. 

नवी दिल्ली : दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. मंगळवारी पाच चोरट्यांनी रस्त्यावर डान्स केला. यावेळा एकजण सीसीटीव्हीच्यासमोर तोंडावर रुमाल बांधून मिथुन स्टाईलने डान्स करत होता. सीसीटीव्हीच्या फूटेजमधून असे दिसून येत होते की तो मुद्दाम डान्स करत होता. त्याच्या  बाकीच्या साथीदारांनी पाठिमागे असणा-या दुकानांची शटर उघडली आणि त्या दुकांनामधून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइल लंपास केले. 

ज्यावेळी एका दुकानाच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यावेळी ही चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी मंगळवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास चोरी केली. त्यांनी सुरुवातीला दुकान नं. 1230 चे शटर उघडले. त्या दुकानातील अडीच लाख रोकड, 10-20 हार्ड डिक्स, 20-25 रॅम आणि मोबाइल लंपास केले. त्यानंतर याच गल्लीतील दुकान नं. 917, 1232 आणि 1226 चे शटर तोडून चोरी केली. ही घटना दिल्लीतील नॉव्हल्टी सिनेमाच्या पाठिमागे असलेल्या महल गल्ली घटली. 

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुकान नं. 1230 च्या मालकाने सांगितले की, याप्रकरणी सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. तसेच, याआधीही या परिसरात चो-या झाल्यामुळे पोलिसांवर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.   

टॅग्स :Crimeगुन्हाNew Delhiनवी दिल्ली