चोरट्यांनी डान्स करत पाच दुकानांची केली लूट

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 14:31 IST2018-07-11T14:28:55+5:302018-07-11T14:31:59+5:30

दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. 

Thieves looted 5 shops dancing on the roads in Delhi | चोरट्यांनी डान्स करत पाच दुकानांची केली लूट

चोरट्यांनी डान्स करत पाच दुकानांची केली लूट

नवी दिल्ली : दिल्लीत चोरीच्या घटना वाढल्या आहेत. येथील लोक चोरट्यांपासून सावध आहेत. मात्र, चोरट्यांनी अनोखी शक्कल लढवत पाच दुकानातून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइलची लूट केली आहे. ही घटना सीसीटीव्हीच्या माध्यमातून उजेडात आली आहे. 
मंगळवारी पाच चोरट्यांनी रस्त्यावर डान्स केला. यावेळा एकजण सीसीटीव्हीच्यासमोर तोंडावर रुमाल बांधून मिथुन स्टाईलने डान्स करत होता. सीसीटीव्हीच्या फूटेजमधून असे दिसून येत होते की तो मुद्दाम डान्स करत होता. त्याच्या  बाकीच्या साथीदारांनी पाठिमागे असणा-या दुकानांची शटर उघडली आणि त्या दुकांनामधून रोकड, हार्ड डिक्स, मोबाइल लंपास केले. 


ज्यावेळी एका दुकानाच्या मालकाने सीसीटीव्ही फुटेज पाहिले, त्यावेळी ही चोरीची घटना उघडकीस आली. चोरट्यांनी मंगळवारी सकाळी चार वाजताच्या सुमारास चोरी केली. त्यांनी सुरुवातीला दुकान नं. 1230 चे शटर उघडले. त्या दुकानातील अडीच लाख रोकड, 10-20 हार्ड डिक्स, 20-25 रॅम आणि मोबाइल लंपास केले. त्यानंतर याच गल्लीतील दुकान नं. 917, 1232 आणि 1226 चे शटर तोडून चोरी केली. ही घटना दिल्लीतील नॉव्हल्टी सिनेमाच्या पाठिमागे असलेल्या महल गल्ली घटली. 


दरम्यान, याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर, दुकान नं. 1230 च्या मालकाने सांगितले की, याप्रकरणी सर्व सीसीटीव्ही फुटेज पोलिसांना दिले आहे. तसेच, याआधीही या परिसरात चो-या झाल्यामुळे पोलिसांवर नाराज असल्याचे त्यांनी सांगितले.   

Web Title: Thieves looted 5 shops dancing on the roads in Delhi