शहरं
Join us  
Trending Stories
1
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
2
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
3
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
4
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
5
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
6
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
7
मुंबईत राहून मिळत आहे माथेरानच्या थंडीचा आनंद, पारा १८ अंशांवर; तापमान १६ अंशांवर उतरणार?
8
बिहारप्रमाणे पश्चिम बंगालमधील ‘जंगलराज’ हटवणारच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला निर्धार
9
लोका सांगे ब्रह्मज्ञान, स्वतः कोरडे पाषाण; प्रशांत किशोर यांच्या ‘जन सुराज’ला भोपळा
10
ऑफलाइनही भरता येणार उमेदवारी अर्ज
11
डाळी, भाज्या, इंधनामुळे येऊ लागले स्वस्ताईचे दिवस, घाऊक महागाई घटून उणे १.२१ टक्क्यावर; २७ महिन्यांचा गाठला नीचांक
12
दुर्बल लोकांविरुद्ध गुन्हा करणाऱ्यांना दया नाही, विशेष पॉक्सो न्यायालयाने सुनावले; तरुणाला १० वर्षांची शिक्षा
13
शिल्पकार राम सुतार यांच्या माध्यमातून जगभरात भारताचा लौकिक, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुकौद्गगार
14
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
15
तिरंदाजी: अंकिता भकत, धीरज बोम्मादेवराने पटकावली सुवर्णपदके
16
मुंबई विद्यापीठाच्या प्राध्यापकांचे १७ नोव्हेंबरपासून आंदोलन
17
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
18
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
19
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
20
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
Daily Top 2Weekly Top 5

"...तर हे लोक महात्मा गांधींऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील"; असदुद्दीन ओवैसींचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2021 12:43 IST

Asaduddin Owaisi And Rajnath Singh : एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राजनाथ सिंह यांच्या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे.

नवी दिल्ली - संरक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी मंगळवारी विनायक दामोदर सावकर (Vinayak  Damodar Savarkar) आणि महात्मा गांधी (Mahatma Gandhi) यांच्या संबंधावर मोठं वक्तव्यं केलं आहे. 'अंदमानच्या तुरुंगात कैद असताना महात्मा गांधींच्या सांगण्यावरुनच विनायक सावरकरांनी ब्रिटिश सरकारकडे दया याचिका दाखल केली होती', असं राजनाथ सिंह म्हणाले आहेत. याच दरम्यान एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी (Asaduddin Owaisi) यांनी राजनाथ सिंह यांच्या या विधानावरून जोरदार निशाणा साधला आहे. "...तर हे लोक महात्मा गांधींऐवजी सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील" असं म्हणत हल्लाबोल केला आहे.

असदुद्दीन ओवैसी यांनी "हे लोक चुकीचा इतिहास मांडत आहेत. हे असंच चालू राहिलं तर ते महात्मा गांधी यांना काढून ज्या सावरकरांवर महात्मा गांधींच्या हत्येचा आरोप होता आणि जस्टिस जीवनलाल कपूर यांच्या चौकशीत त्यांना दोषी ठरवण्यात आलं होतं, त्या सावरकरांना राष्ट्रपिता बनवतील" अशी जोरदार टीका केली आहे. राजनाथ सिंह उदय माहूरकर आणि चिरायू पंडित यांच्या ‘वीर सावरकर हु कुड हॅव प्रीवेंटेड पार्टिशन’  या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. सरसंघचालक मोहन भागवत यांचीही या कार्यक्रमात उपस्थिती होती. यावेळी राजनात सिंह म्हणाले की, सावरकरांच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल आणि त्यांच्या कार्याबद्दल मतभेद असू शकतात. पण, त्यांच्या विचारसरणीवरुन त्यांचे देशासाठीचे योगदान नाकारता येणार नाही.'

"एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट सावरकरांच्या जीवन, विचारधारेपासून अपरिचित"

राजनाथ सिंह पुढे म्हणाले, 'एका विशिष्ट विचारधारेने प्रभावित झालेला गट सावरकरांच्या जीवन आणि विचारधारेपासून अपरिचित आहे आणि त्यांना सावरकरांची योग्य समज नाही. काहीजण त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करतात. पण, सावरकर एक महान स्वातंत्र्य सेनानी आणि महाननायक होते, आहेत आणि भविष्यातही असतील. देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्याची त्याची इच्छाशक्ती किती प्रबळ होती, याचा अंदाज यावरुन घेता येतो की, ब्रिटिशांनी त्यांना दोनवेळा जन्मठेपेची शिक्षा सुनावली. काही विशिष्ट विचारसरणीने प्रभावित झालेले लोक अशा राष्ट्रवादी नायकावर प्रश्नचिन्ह उपस्थित करतात.'

"सावरकर हे 'वास्तववादी' आणि 'राष्ट्रवादी' होते"

संरक्षण मंत्री पुढे म्हणतात की, काही विशिष्ट लोक सावरकरांवर नाझी, फॅसिस्ट असल्याचा आरोप करतात. पण, सत्यात ज्यांनी असे आरोप केले, ते स्वतः लेनिनवादी, मार्क्सवादी विचारसरणीने प्रभावित झाले आणि अजूनही आहेत. साध्या शब्दात सांगायचे तर, सावरकर हे 'वास्तववादी' आणि 'राष्ट्रवादी' होते, ज्यांनी बोल्शेविक क्रांतीसह निरोगी लोकशाहीची चर्चा करायचे.' 

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीRajnath Singhराजनाथ सिंहMahatma Gandhiमहात्मा गांधीVinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकर