थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 16:36 IST2025-10-31T16:34:39+5:302025-10-31T16:36:04+5:30
Uttar Pradesh Crime News: उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री संजीय कुमार गोंड यांचा ताफा अडवून कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

थेट मंत्र्यांच्या ताफ्यालाच पाठलाग करून अडवले, वादावादी, कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न, कारण काय?
उत्तर प्रदेशमधील योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील सरकारमधील मंत्री संजीय कुमार गोंड यांचा ताफा अडवून कारची तोडफोड करण्याचा प्रयत्न काही जणांनी केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मंत्री गोंड यांच्या ताफ्यातीला एस्कॉर्ट वाहनाला ओव्हरटेक करण्यावरून हा वाद झाला होता. आता या प्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. तर दोघे आरोपी फरार आहेत. त्यांचा शोध घेतला जात आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशचे समाजकल्याण राज्यमंत्री संजीव कुमार गोंड ताफ्याला ओव्हरटेक केल्याप्रकरणी सोनभद्र येथे एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. ही घटना काल संध्याकाळी घडली. जिल्हाधिकारी कार्यालयातून परतत असताना एका कारने मंत्र्यांच्या एस्कॉर्ट गाडीचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. या कारने वारंवार ताफा रोखण्याचा प्रयत्न केला. अखेरीस चोपन पुलाजवळ रस्त्यावर गाडी आडवी लावून त्यांनी ताफा रोखला. त्यानंतर सुरक्षा रक्षकांशी वाद घालत मंत्र्यांच्या कारवर जोराजोरात हात मारण्यास सुरुवात केली. या घटनेची माहिती तातडीने पोलिसांना देण्यात आली. तेव्हा पोलिसांनी कारवाई करत अंकित मिश्रा नावाच्या एका व्यक्तीला अटक केली. मात्र त्याचे दोन साथीदार फरार झाले.
सोनभद्रचे पोलीस अधीक्षक अभिषेक वर्मा यांनी या घटनेबाबत सांगितले की, गोंड आणि जिल्हा परिषदेचे सदस्या संजीव कुमार त्रिपाठी हे गुरुवारी संध्याकाळी रॉबर्ट्सगंजहून गालाच्या दिशेने जात होते. त्याचवेळी चोपनजवळ दुसऱ्या कारमधून जात असलेल्या लोकांमध्ये आणि मंत्र्यांच्या ताफ्यासोबत चाललेल्या पोलीस एस्कॉर्ट गाडीमध्ये असलेल्या लोकांमध्ये वाद झाला. ओव्हरटेकवरून आरोपी आणि मंत्र्यांच्या सुरक्ष रक्षणांमध्ये हा वाद झाल्याची प्राथमिक माहिती आहे, असे त्यांनी सांगितले.