शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
3
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
4
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
5
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
6
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
7
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
8
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
9
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
10
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
11
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
12
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
13
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
14
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
15
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
16
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
17
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
18
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
19
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
20
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
Daily Top 2Weekly Top 5

"हे हिंदू गद्दार आहेत"; युवराजच्या वडिलांची शेतकरी आंदोलनामध्ये वादग्रस्त वक्तव्ये; अटकेची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2020 12:31 IST

Farmer Protest in Delhi : दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या त्यांच्या राज्यात आंदोलन करत असलेले शेतकरी आता दिल्लीमध्ये संसदेला घेरण्य़ाच्या प्रयत्नात असून ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे.

वादग्रस्त विधानांमुळे नेहमी वादात सापडणारे माजी क्रिकेटपटू योगराज सिंह यांनी शेतकरी आंदोलकांमध्ये जाऊन वादग्रस्त भाषण दिले आहे. योगराज यांनी हिंदूंवर वादग्रस्त वक्तव्य केले असून त्यांच्या अटकेची मागणी जोर धरू लागली आहे. माजी क्रिकेटपटू युवराजचे वडील योगराज हे शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी गेले होते. 

दिल्लीच्या सीमेवर लाखो शेतकरी जमा झाले आहेत. केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे रद्द करण्याची मागणी ते करत आहेत. यासाठी गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्या त्यांच्या राज्यात आंदोलन करत असलेले शेतकरी आता दिल्लीमध्ये संसदेला घेरण्य़ाच्या प्रयत्नात असून ८ डिसेंबरला भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने दिल्लीच्या सीमेवर मोठा फौजफाटा तैनात करून या शेतकऱ्यांवर पाण्याचा फवारा, अश्रूधूर, बॅरिकेड्स लावत रोखले आहे. आज केंद्र सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये चर्चेची पाचवी फेरी होणार आहे. यातच शेतकऱ्यांनी आज ही आरपारची लढाई असेल असा इशारा सरकारला देत केवळ कृषी कायदे रद्द करण्यावरच चर्चा होईल असे सांगितले आहे. तसेच पुढील आठवड्यात आंदोलन आणखी तीव्र करून संसदेला घेराव घालण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना देशभरातून पाठिंबा मिळू लागला आहे.  युवराज सिंहचे वडील योगराज देखील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी आंदोलन स्थळी गेले होते. त्यांच्या भाषणाचा व्हिडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल होऊ लागला आहे. ट्विटर वर 'Arrest Yograj Singh' ट्रेंड होत आहे. अनेकांनी योगराज यांचे भाषण निंदनीय, भावना भडकाविणारे, अपमानजनक असल्याची टीका केली आहे. योगराज हे या व्हिडीओमध्ये पंजाबीमधून भाषण करताना दिसत आहेत. यामध्ये ते हिंदूंना 'गद्दार' म्हणताना दिसत आहेत. ''हे हिंदू गद्दार आहेत, त्यांनी शंभर वर्षे मोगलांची गुलामी केली.'' असे म्हटले आहे. यानंतर त्यांनी महिलांबाबतही वादग्रस्त वक्तव्य केले आहे. युवराजला भारतीय संघात स्थान मिळत नसल्याने त्यांनी अनेकदा तत्कालीन कप्तान धोनीवरही वादग्रस्त टीका केली होती. 

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपYuvraj Singhयुवराज सिंग