देशातील गावागावात पोहोचणार 'मोदी की गॅरंटीवाली गाडी', 4 जाती केंद्रस्थानी; काय म्हणाले PM मोदी?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 30, 2023 02:41 PM2023-11-30T14:41:22+5:302023-11-30T14:45:05+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कुठल्याही जातीचे कुणीही असो, सर्वांना सशक्त करायचे आहे. त्यांची स्वप्न साकार करायची आहेत.

these 4 castes are most important For me pm narendra modi disclosed which are the four largest castes in india | देशातील गावागावात पोहोचणार 'मोदी की गॅरंटीवाली गाडी', 4 जाती केंद्रस्थानी; काय म्हणाले PM मोदी?

देशातील गावागावात पोहोचणार 'मोदी की गॅरंटीवाली गाडी', 4 जाती केंद्रस्थानी; काय म्हणाले PM मोदी?

देशातील प्रत्येक गावात मोदीच्या विकासाची गॅरंटी देणारी गाडी पोहोचणार आहे. आज विकसित भारत संकल्प यात्रेला 15 दिवस पूर्ण झाले आहेत. आम्ही या गाडीचे नाव 'विकास रथ' असे ठेवले होते. मात्र, गेल्या 15 दिवसांत लोकांनीच या गाडीचे नामांतर 'मोदी की गॅरंटीवाली गाडी' असे केले. आपला हा विश्वास पाहून मला अधिक आनंद वाटला. म्हणूनच, मी तुम्हाला विश्वास देतो की, तुम्हाला दिलेल्या सर्वच गॅरंटी मी पूर्ण करणार आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले. एवढेच नाही, तर "माझ्यासाठी देशातील चार जाती सर्वात मोठ्या आहेत. जर यांचे  कल्याण झाले, तर संपूर्ण समाजची प्रगती होईल," असेही मोदी म्हणाले. आज त्यांनी विकसित भारत संकल्प यात्रेतील (Viksit Bharat Sankalp Yatra) लाभार्थ्यांसोबत संवाद साधला. यावेळी ते बोलत होते.   

मोदी म्हणाले, आपल्यासाठी गरीब, तरुण, महिला आणि शेतकरी या चार जाती सर्वात मोठ्या आहेत आणि आपण यांच्यासाठीच सर्वाधिक काम करत आहोत.

या 4 जातींना उभारी दिल्याशिवाय देश सशक्त होणार नाही - 
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, कुठल्याही जातेचे कुणीही असो, सर्वांना सशक्त करायचे आहे. त्यांची स्वप्न साकार करायची आहेत. संकल्पापासून सिद्धीकडे न्यायचे आहे. शेतीपासून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवायचे आहे. शेतकरी, तरून, महिला आणि गरीब, या चार जेतींचे जोवर कल्याण होणर नाही, तोवर भारत सशक्त होणार नाही

4 अमृत स्तंभांवर भारताचा संकल्प - 
पंतप्रधान मोदी म्हणाले, विकसित भारताचा संकल्प चार अमृत स्तंभांवर अवलंबून आहे. हे अमृतस्तंभ म्हणजे, आपली स्त्री शक्ती, आपली युवा शक्ती, आपले शेतकरी आणि देशातील गरीब कुटुंबे. या चार जातींच्या उत्थानानेच भारताचा विकास होईल. आपल्या सरकारने निराशेचे वातावरण बदलले आहे. आज देशात जे सरकार आहे, ते जनतेला देव मानणारे सरकार आहे. आम्ही सस्ता भावनेने नाही, तर सेवा भावनेने काम करणारे आहोत.
 

Web Title: these 4 castes are most important For me pm narendra modi disclosed which are the four largest castes in india

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.