शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांसोबत केले, तेच आदित्य करताहेत”; शिंदेंच्या नेत्यांनी इतिहास काढला
2
LPG Gas Cylinder Booking Rules : गॅस सिलिंडर बुकिंगशी संबंधित २ नवीन अपडेट्स, एलपीजी पुरवठ्याबाबत सरकारने काय सांगितले? जाणून घ्या
3
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
4
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
5
Savita Pradhan : "नवरा छळायचा, बादलीत लघवी करुन अंगावर फेकली", IAS सविता प्रधान सांगतात असह्य छळ
6
"तर महाराष्ट्राला मोठी किंमत चुकवावी लागेल"; विजय वडेट्टीवार यांचा महायुतीला सूचक इशारा
7
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
8
आता प्रवासावेळी टायर फाटलं तरी टेन्शन नाही...! या नव्या SUV ची जोरदार चर्चा; फीचर्सही भन्नाट
9
Home Decoration: मातीची गरज नाही, फक्त हवी काचेची बरणी आणि रोपटं! 'वॉटर गार्डनिंग'ने बदला घराचा लूक
10
छ. संभाजीनगर, वाठार, पेठवडगाव, जयसिंगपूर ४ बस स्थानकांचे उद्घाटन; प्रताप सरनाईकांचा दौरा
11
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
12
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
13
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
14
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
15
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
16
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
17
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
18
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
19
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
20
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
Daily Top 2Weekly Top 5

अधिवेशनाच्या दुसऱ्या सत्रातही गोंधळ होणार

By admin | Updated: April 23, 2016 02:42 IST

येत्या सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र प्रचंड गदारोळातच पार पडणार अशी चिन्हे आहेत. काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संयुक्त डावपेच आखण्यासाठी

शीलेश शर्मा, नवी दिल्लीयेत्या सोमवारपासून संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे दुसरे सत्र प्रचंड गदारोळातच पार पडणार अशी चिन्हे आहेत.काँग्रेससह इतर विरोधी पक्षांनी संयुक्त डावपेच आखण्यासाठी विचारविनिमय सुरू केला आहे. काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्यासह सर्व मोठ्या नेत्यांसोबत या मुद्यावर प्रदीर्घ चर्चा केली. यावेळी इशरत जहाँ बनावट चकमकीचा मुद्दाही समोर आला. भाजपा या आधारेच काँग्रेसवर दबाव आणण्याचा प्रयत्न करेल.पक्षाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस त्याच्या प्रत्युत्तरात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांच्यावर हल्लाबोल करेल. तसेच न्यायालयातील निर्णयांच्या आधारे तत्कालीन केंद्र सरकारचा या प्रकरणाशी कुठलाही थेट संबंध नव्हता. ही गुजरातेतील घटना असून तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी आणि शहा यांनी ती दाबण्याचा प्रयत्न केला हे सिद्ध करेल. याशिवाय इतर विरोधी पक्षांच्या सहकार्याने संयुक्त डावपेच आखून उत्तराखंड व अरुणाचलच्या मुद्यावरून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न काँग्रेस करेल. राष्ट्रीय तपास संस्थेच्या (एनआयए) गैरवापरावरून काँग्रेस आणि त्याचे मित्र पक्ष दोन्ही सभागृहात गोंधळ घालतील. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वरिष्ठ नेत्यांच्या बचावाकरिता सरकार तपास संस्थेवर दबाव आणत असल्याचा आरोप यावेळी केला जाईल. सरकारचीही जय्यत तयारीकाँग्रेससह संपूर्ण विरोधकांच्या आव्हानांचा मुकाबला करण्यासाठी सरकारनेही जय्यत तयारी सुरू केली आहे. अरुण जेटली, वेंकय्या नायडू, रविशंकर प्रसाद, अर्जुन मेघवाल, राजीव प्रताप रुडी यांच्यासह इतर काही वरिष्ठ नेत्यांना विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याची पूर्वतयारी करण्यास सांगण्यात आले आहे. कोण कुठल्या मुद्याला उत्तर देणार याचा निर्णय अद्याप व्हायचा आहे. रविवारी सायंकाळी भाजपा नेतृत्व आणि पंतप्रधान मोदी या मुद्यावर अंतिम निर्णय घेतील. अरुणाचल आणि उत्तराखंडमधील सरकार अस्थिर करण्याच्या प्रश्नावर सरकार संभ्रमात आहे. कारण या मुद्यावर कुठलाही मित्र पक्ष सरकारच्या सोबत नाही. यापूर्वी प्रत्येक वेळी सरकारच्या पाठीशी उभे राहणारे शिवसेना, अण्णाद्रमुक, तेलगू देसम पार्टी, बीजू जनता दलसारखे पक्ष मोदी सरकारच्या या निर्णयांना विरोध करीत आहेत.