शहरं
Join us  
Trending Stories
1
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
2
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
3
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
4
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
5
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
6
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
7
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
8
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
9
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
10
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
11
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
12
टी-२० इंटरनॅशनलमध्ये या विक्रमाची केवळ बरोबरीच होऊ शकते; मोडणं अशक्य! केवळ २ गोलंदाजांनाच जमलाय हा अद्भुत चमत्कार
13
हवाई प्रवास स्वस्त होणार? विमानाच्या इंधनात इथेनॉल मिश्रणास केंद्राची मंजुरी...
14
न्युड व्हिडिओ व्हायरल प्रकरण: "माझे करिअर खराब होईल, मला माफ करा", उजेरने १६ वर्षाच्या मुलीचा पुन्हा सुरू केला होता छळ
15
तीन राज्यांत काँग्रेसची दाणादाण? किती जागा मिळणार? अमित शाह यांची मोठी भविष्यवाणी; एका राज्यात तर...!
16
अमेरिकेच्या युद्धनौका बंगालच्या उपसागरात पोहोचल्या! इराणचा तेल टँकर लपून-छपून जात होता, २० लाख बॅरल तेल जप्त
17
काव्या मारन ‘फॉरेन’चे प्रेम विसरणार? माजी क्रिकेटरचा SRH ला सल्ला; ती खरंच ही गोष्ट मनावर घेणार का?
18
प्रेमात दगा! 'भाऊ' म्हणणाऱ्या मित्रासोबत पत्नी झाली फरार, जाताना लुटले लाखो रुपये आणि सोन्याचे दागिने!
19
२ दिवसांत १०० कॉल्स... बायकोने दिली नवऱ्याच्या हत्येची सुपारी; नशीब बलवत्तर म्हणून 'तो' वाचला
20
भारतात येत असणाऱ्या जहाजवर IRGC ने केला हल्ला, जप्त करून इराणला घेऊन गेले
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावरील अवकाळी पावसाचे ढग सरले

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

तापमानात किंचीत घट

तापमानात किंचीत घट

पुणे : गेल्या पाच-सहा दिवसांपासून राज्यावर घोंगावणारे अवकाळी पावसाचे ढग आज सरले. राज्यातील ढगाळ हवामान गायब होताच काही भागांच्या तापमानात थोडी घट झाली. विदर्भ, मराठवाड्यातील काही भागांचे तापमान सरासरीच्या खाली गेले होते. राज्यात सर्वात कमी १०.४ अंश सेल्सिअस तापमान नाशिकमध्ये नोंदविले गेले.
बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या प˜्यामुळे राज्यात अवकाळी पाऊस पडला होता. विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये वादळी वार्‍यासह गारपीटही झाली होती. त्यामुळे राज्यातून थंडी गायब झाली होती. कमाल आणि किमान तापमानात मोठी वाढ झाल्याने उकाडा जाणवत होता. काल बंगालच्या उपसागरातील हवेचा कमी दाबाचा प˜ा विरल्याने राज्यावरील अवकाळी पावसाचे सावट दूर झाले. ढगाळ हवामान सरताच तापमानात घट होण्यास सुरूवात झाली.
पुढील ४८ तास राज्याचे हवामान कोरडे राहण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे तापमानात आणखी घट होण्याचा अंदाज आहे.
दरम्यान, आज पुण्याचे किमान तापमान स्थिर होते मात्र कमाल तापमानात मोठी वाढ झाली. दिवसाचे तापमान ३३ अंश तर रात्रीचे तापमान १२.५ अंश सेल्सिअस नोंदविले गेले. आज दिवसाचे तापमान वाढल्याने उकाडा जाणवत होता. पुढील २४ तासात शहराच्या तापमानात थोडी घट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तविली आहे.
प्रमुख शहरांमधील किमान तापमान (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे १२.५, अहमदनगर १३.१, जळगाव १२.२, कोल्हापूर १७, महाबळेश्वर १५, मालेगाव १३.४, नाशिक १०.४, सांगली १६.७, सातारा १३.९, सोलापूर १८.१, मुंबई २०.८, अलिबाग १७.६, रत्नागिरी १७.१, डहाणू १५.९, भिरा १३, उस्मानाबाद १४.९, औरंगाबाद १३.४, परभणी १५.५, नांदेड १४, बीड १५, अकोला १३.२, अमरावती १४.२, बुलडाणा १४.२, ब्रम्हपुरी १४.१, चंद्रपूर १४.६, नागपूर १२.२, वाशिम १९.८, वर्धा १३.२, यवतमाळ १२.२.
-----