शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

'आप'च्या आमदारांना थोडा दिलासा अन् धाकधूक, तूर्त पोटनिवडणूक नको; न्यायालयाचे फर्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 00:53 IST

लाभाच्या पदामुळे निलंबित झालेल्या आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. निलंबन प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होईपर्यंत संबंधित २० मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले.

नवी दिल्ली : लाभाच्या पदामुळे निलंबित झालेल्या आम आदमी पक्षाच्या २० आमदारांना दिल्ली उच्च न्यायालयाने बुधवारी तात्पुरता दिलासा दिला. निलंबन प्रकरणाची पुढील सुनावणी २९ जानेवारी रोजी होईपर्यंत संबंधित २० मतदारसंघांत पोटनिवडणुका जाहीर न करण्याचे निर्देश न्यायालयाने निवडणूक आयोगास दिले.निलंबनाची आयोगाची शिफारस मात्र न्यायालयाने लगेच रद्द न केल्याने आमदारांपुढील संकट कायम आहे. निलंबन प्रक्रियेतीलसारे दस्तावेज ६ फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याचे आदेश न्यायालयाने केंद्र सरकार, निवडणूक आयोग व मूळ याचिकाकर्ते अ‍ॅड. प्रशांत पटेल यांना दिले आहेत.दिल्लीत काँग्रेस व भाजपाने पोटनिवडणुकांची लगेच तयारी सुरू केली आहे. ‘आप’ मात्र न्यायालयात न्याय मिळण्याच्या आशेवर आहे. घटनातज्ज्ञांच्या मते ‘आप’ला दिलासा मिळण्याची शक्यता कमीच आहे. ‘संसदीय सचिव’ पदासोबतचे लाभ स्वीकारले नसल्याचा दावा निलंबित आमदार करीत असले, तरी त्यांनी सोयी-सुविधा वापरल्या आहेत. निवडणूक आयोगाने हाच आधार मानून निलंबनाची शिफारस राष्ट्रपतींकडे केली होती.निवडणूक आयोगाने केलेली शिफारस रद्द करण्याची मागणी आपने न्यायालयाकडे केली. न्या. एस रवींद्र भट यांच्या खंडपीठासमोर या आमदारांनी बुधवारी गाºहाणे मांडताना आयोगाने आमचे म्हणणे ऐकून न घेताच शिफारस केल्याचा दावा आणि आयोगावर राजकीय दबाव असल्याचा आरोपही केला.न्यायालयाने केंद्र सरकार व निवडणूक आयोगाकडे विस्तृत स्पष्टीकरण मागितले आहे. आमदारांची बाजू, निलंबन प्रक्रिया कशी पूर्ण केली, याची माहिती आता आयोगास सादर करावी लागेल. आमदारांना अपात्र ठरविण्याची शिफारस निवडणूक आयोगाने राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे केली होती. राष्ट्रपतींनी शिक्कामोर्तब केल्याने २० जणांची आमदारकी रद्द झाली.निर्णयाबाबत संशय-आयोगाच्या निर्णयावरच ‘आप’ने संशय व्यक्त केला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त अचल कुमार ज्योती यांनी निवृत्तीपूर्वी निर्णय घेतला.आयोगाने सूडबुद्धीने हानिर्णय घेतला आणि राष्ट्रपतींनी लगेच त्यावर मोहोर उठवली, अशी भूमिका ‘आप’ने न्यायालयात घेतली.

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालAAPआप