शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजांवर गोळीबार! इराणचा आक्रमक पवित्रा; पुन्हा युद्धाची ठिणगी?
2
आता क्युबाकडे मोर्चा वळला? अमेरिकेच्या सर्वात महागड्या ड्रोनने ६ तास घिरट्या घातल्याने खळबळ; काय आहे अमेरिकेचा गेमप्लॅन?
3
लहानपणी वडिलांना गमावलं, आईनं शाळेत झाडू मारून शिकवलं; आज मुलगा शिक्षण मंत्रालयात बनला अधिकारी
4
JNPT बंदरात भीषण स्फोट! केमिकल प्लांटमध्ये ब्लास्ट; धुराचे लोट लांबपर्यंत
5
लोकसभेतील ५४३ जागांसाठी का लागू होऊ शकत नाही महिला आरक्षण, सरकार अन् विरोधकांचे दावे काय?
6
"जितेंद्र शेळके यांचा मृत्यू अपघात की घातपात?" अंजली दमानिया यांनी उपस्थित केले खळबळजनक प्रश्न
7
छत्तीसगढप्रकरणी अनिल अग्रवालांवर FIR, समर्थनार्थ उतरले नवीन जिंदल; म्हणाले, "ही दु:खद..."
8
तुम्हालाही रात्री २-३ वाजता अचानक खूप भूक लागते, रोजची सवय की शरीर देतंय धोक्याचा इशारा?
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला शेगडी पूजनाची हमी, अन्नपूर्णेच्या आशीर्वादाने धन-धान्य पडणार नाही कमी!
10
IPL Record : विक्रमी सेंच्युरीसह RCB नं रचला इतिहास; MI आणि CSK ला नाही जमलं ते त्यांनी करून दाखवलं
11
PM नरेंद्र मोदी आज रात्री ८.३० वाजता देशाला संबोधित करणार; महिला आरक्षणावर बोलण्याची शक्यता
12
परशुराम जयंती २०२६: महेंद्रगिरीवरील भगवान परशुराम मंदिराचा थक्क करणारा इतिहास माहितीय का?
13
हिरव्या जर्सीत कसा आहे RCB चा रेकॉर्ड? विराटसह एकाही भारतीयाला मिळाला नाही 'मॅन ऑफ द मॅच' पुरस्कार
14
UPI द्वारे सतत पैसे भरल्यानं तुमचा Credit Score कमी होतो का; काय आहे यामागचं सत्य?
15
अक्षय्य तृतीया २०२६: अक्षय्य तृतीयेला 'या' मुहूर्तावर करा शास्त्रोक्त पूजा; धन, धान्य संपत्तीत होईल वाढ!
16
Strait of Hormuz Closed : जगाची चिंता वाढणार! इराणने होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा केली बंद; तेलाचा पुरवठा विस्कळीत; महागाईचा भडका उडणार?
17
पैसे, दागिने, लॉटरीची हाव... पुतणीने बॉयफ्रेंडच्या मदतीने काढला काकीचा काटा; 'अशी' झाली पोलखोल
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं स्वस्त; खरेदीदारांना दिलासा, जाणून घ्या १८ ते २४ कॅरेटपर्यंतचे सोन्याचे आजचे दर
19
Danish Khan : "माझा मुलगा निर्दोष, त्याला..."; TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी दानिशच्या आईचा धक्कादायक दावा
20
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
Daily Top 2Weekly Top 5

शेतक-याच्या जीवापेक्षा काहीच मोठे नाही - नरेंद्र मोदी

By admin | Updated: April 23, 2015 15:25 IST

शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले.

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. २३ - शेतक-यांच्या जीवनापेक्षा काही मोठे नाही, असे सांगत शेतक-यांच्या आत्महत्यांच्या घटना रोखण्यासाठी सर्व सदस्यांनी दिलेल्या सूचना ऐकण्यासा आपण तयार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्ट केले. दिल्लीत काल घडलेल्या
घटनेमुळे आपण अतिशय दु:खी झालो असेही ते म्हणाले. 
दिल्लीत किसान रॅलीदरम्यान सर्वांदेखत झाडाला गळफास लावून आत्महत्या करणा-या गजेंद्र सिंग या शेतक-याच्या मृत्यमुळे संपूर्ण देश हादरला. त्याच पार्श्वभूमीवर लोकसभेत या वि,यावर चर्चा करण्यात आली. या मुद्यावर गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी निवेदन दिल्यावर पंतप्रधानांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या. शेतक-यांच्याा आत्महत्या ही खूप जुनी व व्यापक समस्या असून देशासाठी तो चिंतेचा विषय आहे. प्रत्येक सरकारने त्यांच्या काळात ही समस्या सोडवण्यासाठी शक्य तितके प्रयत्न केले. भूतकाळात आपले प्रयत्न कुठे कमी पडले हे तपासून पाहण्याची गरज असून या समस्येवर योग्य उपाययोजना शोधण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले. 
विरोधकांचा संसदेत गोंधळ
गजेंद्र सिंगच्या आत्महत्येप्रकरणी गृहमंत्री व पंतप्रधानांनी निवेदन द्यावे अशी मागणी करत विरोधकांनी संसदेत  गदारोळ माजवल्यामुळे संसदेचे कामकाज काही काळासाठी तहकूब करण्यात आले.  गजेंद्र जेव्हा आत्महत्या करत होता तेव्हा पोलिस काय करत होते, त्यांनी त्याला रोखण्यासाठी काहीच प्रयत्न का केले नाही असा सवाल काँग्रेसचे गट नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला. गजेंद्रच्या मृत्यूला पोलिस जबाबदार असून याप्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हायला हवी अशी मागणीही त्यांनी केली.
 
शेतकरी आत्महत्येवरून राजकारण नको - राजनाथ सिंग
कालची घटना अतिशय गंभीर व दुर्दैवी असून कोणत्याही पक्षाने या मुद्यावरून राजकारण करू नये असे  गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी सांगितले. गजेंद्र सिंग आत्महत्या करण्यासाठी जेव्हा झाडावर चढला तेव्हा आजूबाजूचे लोक टाळ्या वाजवत त्याला उकसवत होते. मात्र पोलिसांनी त्याला वाचवण्याचा आटोकाट प्रयत्न केला, असे त्यांनी स्पष्ट केले. पोलिसांनी तत्काळ अग्निशमन दलाला पाचारण करत गजेंद्रला वाचवायचा प्रयत्न केला, मात्र अखेर ते अपयशी ठरले, असे सिंग म्हणाले. याप्रकरणी संसदमार्ग पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा तपास करण्याची जबाबदारी क्राईम ब्रांचकडे सोपवण्यात आल्याचे सिंग यांनी स्पष्ट केले.