शहरं
Join us  
Trending Stories
1
मुहूर्त ट्रेडिंग: शेअर बाजारात तेजी; निफ्टी वर्षाच्या सर्वोच्च पातळीवर, सेन्सेक्स 62 अंकांनी वधारला
2
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!
3
अमित शाह यांच्यावर गंभीर आरोप, प्रशांत किशोर यांनी दाखवला फोटो; जनसुराजच्या उमेदवाराचं अपहरण?
4
"तात्या विंचू तुम्हाला चावेल...", संजय राऊतांच्या टीकेवर महेश कोठारेंची प्रतिक्रिया, म्हणाले- "ते माझ्याविषयी जे बोलले..."
5
युनूस सरकारला IMFचा मोठा धक्का! बांगलादेशला दिली जाणारी ८०० दशलक्ष डॉलर्सची मदत थांबवली...
6
"मला तू आवडत नाहीस, कधीच आवडणार नाहीस"; व्हाईट हाऊसमध्ये राडा, ऑस्ट्रेलियन राजदूताला ट्रम्प यांचा टोला
7
India Probable Playing 11 vs Australia 2nd ODI: कांगारुंना जाळ्यात अडकवण्यासाठी गंभीर हा डाव खेळणार?
8
नीतीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री बनूच शकणार नाहीत..! बिहार निवडणुकांपूर्वी मोठी भविष्यवाणी
9
Bhai Dooj 2025: यमराज भाऊबीजेला आले, तेव्हा यमुनेला काय मिळाली ओवाळणी?
10
मृत्यूनंतरही घरात फिरतोय पत्नीचा आत्मा, अभिनेत्याने सांगितला अनुभव म्हणाला- "अचानक कापूरचा वास आला आणि..."
11
चाळीसगावचे माजी आमदार राजीव देशमुख यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन
12
चंद्रपुरात दोन देशी कट्टे, दोन माऊझर, ३५ जिवंत काडतुसे, चार खंजिरांसह चौघांना अटक
13
श्रीराम मंदिर, ऑपरेशन सिंदूर आणि नक्षलवाद..; दिवाळीनिमित्त पीएम मोदींचे देशाला पत्र
14
ट्रम्प यांचा नवा वादग्रस्त निर्णय ! गांजा विक्रेत्याला केले अमेरिकेचा इराकमधील 'विशेष दूत'
15
Diwali Padwa 2025: दिवाळी पाडव्याला नवर्‍याने बायकोला ओवाळणी देणे, हा हक्क की कर्तव्य?
16
पुन्हा एकदा सीमापार स्ट्राईक! जोरदार ड्रोन हल्ला; भारतविरोधी 'मेजर जनरल' मारला गेला?
17
Diwali Car Offers: सर्वात कमी डाऊन पेमेंट भरुन व्हा टाटा पंच ईव्हीचे मालक, 'इतका' असेल ईएमआय!
18
Asrani Net Worth: आपल्या मागे किती संपत्ती सोडून गेले असरानी? जाणून घ्या शिक्षण आणि नेटवर्थ
19
Diwali Bonus: बोनस कमी दिला म्हणून कर्मचाऱ्यांनी केलं असं काही, काही तासांतच कंपनीचं लाखोंचं नुकसान

Rajasthan political crisis: पक्ष सुटला पण दोस्ती कायम; काँग्रेसविरोधात सचिन पायलटांना ज्योतिरादित्यांच थेट 'बळ'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2020 19:31 IST

Rajasthan political crisis: राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यांच्याकडे 24 ते 25 आमदार असल्याचे बोलले जात आहे.

कर्नाटक, मध्य प्रदेशनंतर काँग्रेसच्या ताब्यातून आणखी एक मोठे राज्य जाण्याची शक्यता आहे. राजस्थानमध्ये (Rajasthan political crisis) शनिवारपासून मोठी उलथापालथ सुरु झाली असून उप मुख्यमंत्री सचिन पायलट हे भाजपाच्या संपर्कात असल्याचे बोलले जात आहे. नाराज असलेल्या पायलटांना त्यांचे काही महिन्यांपूर्वीच भाजपात गेलेले मित्र ज्योतिरादित्य शिंदे यांचे पाठबळ मिळाले आहे. शिंदे यांनी पायलट यांचे उघडपणे समर्थन केले आहे. यामुळे राजस्थानमध्येही सत्तापालट अटळ असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. 

ज्योतिरादित्य शिंदे यांनी पूर्वाश्रमीचे मित्र सचिन पायलट यांच्या समर्थनार्थ ट्विट करत काँग्रेसवर जहरी टीका केली आहे. ''माझे जुने साथीदार राहिलेल्या सचिन पायलट यांना मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्याकडून डावलले जात आहे. हे पाहून मी दु:खी आहे. यावरून काँग्रेसमध्ये प्रतिभावान आणि ताकदवान नेत्यांना जागा नसल्याचे स्पष्ट होत आहे., असे ट्विट केले आहे. महत्वाचे म्हणजे ज्योतिरादित्य यांनी काँग्रेस, सचिन पायलट आणि गेहलोत यांना टॅग केले आहे. 

यानंतर शिंदे यांनी काँग्रेसला सोडून भाजपात सहभागी झालेले मध्य प्रदेशचे आमदार प्रद्युम्न सिंह लोधी यांचे स्वागत केले आहे. लोधी यांनी रविवारी भोपाळमध्ये मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहाण यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये प्रवेश केला. काही महिन्यांपूर्वीच शिंदे यांनी काँग्रेसला बायबाय करत भाजपात प्रवेश केला होता. यावेळी त्यांनी 22 आमदारांना राजीनामे द्यायला लावून कमलनाथ सरकार पाडले होते. 20 मार्चला कमलनाथ यांना राजीनामा द्यावा लागला होता. तिथेही शिंदे यांना कमलनाथ बाजुला करत असल्याचा आरोप होता. तर पायलट यांचाही तोच आरोप आहे. 

शिंदे-पायलट मैत्री सर्वश्रूतमध्य़ प्रदेश आणि राजस्थानमध्ये निव़डणुकीवेळी काँग्रेसने तरुण चेहऱ्यांचा डाव खेळला होता. शिंदे यांना तिथे ना मुख्यमंत्री पद मिळाले नाही प्रदेशाध्यक्ष पद. तर राजस्थानमध्ये पायलटना उपमुख्यमंत्री बनविण्यात आले. यामुळे नाराज असलेल्या शिंदे यांनी भाजपमध्ये जात राजकीय धुरिणांनाही धक्का दिला होता. दुसरीकडे सरकार पाडले होते. तेव्हापासून पायलट देखील ट्रेंड करू लागले होते. जर गेहलोत सरकारवर काही संकट आले तर त्य़ामध्ये शिंदे यांचा हात असल्याचे नाकारता येणार नाही, असे राजकीय धुरिणांनी सांगितले. 

थोड्याच वेळात गेहलोत, आमदारांची बैठक

राज्यसभा निवडणुकीनंतर सुरक्षित दिसणारे राजस्थान सरकरा पुन्हा एकदा संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी भाजपावर सरकार पाडण्याचा आरोप केला आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री सचिन पाय़लट दिल्लीत असून त्यांच्याकडे 24 ते 25 आमदार असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर गेहलोत यांनी रात्री मंत्री आणि आमदारांची तातडीची बैठक बोलावली असून या बैठकीला किती आमदार उपस्थित राहतात याकडे लक्ष लागले आहे.  तर रणदीप सुरजेवाला आणि अजय माकन यांना काँग्रेसने जयपूरला पाठविले आहे. मुख्यमंत्र्यांच्या बैठकीला ते हजर राहणार आहेत.

अन्य महत्वाच्या बातम्या...

हार्दिक पटेलांनी गुजरात काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष होताच उत्साहात ट्विट केले; ट्रोल झाले

गेहलोत सरकारची रात्री लिटमस टेस्ट; तातडीची बैठक, दोन डझन आमदार पायलटांकडे

कोरोना पाठ सोडेना! बरा होतोय पण दोन महिन्यांनंतर दिसताहेत ही गंभीर लक्षणे

Rajasthan political crisis: आमदारांनो! लवकर जयपूर गाठा, ज्याचा फोन बंद येईल...; गेहलोतांचे आदेश

मान गए Apple! तैवानच्या खांद्यावर बंदूक ठेवून चीनवर जबरी वार; प्रकल्पच भारतात हलवणार

हद्द झाली! अनुकंपाखाली नोकरी दिली नाही; लॉकडाऊनमध्ये तरुणाने SBI ची हुबेहूब शाखाच उघडली

मोठा दिलासा! पुन्हा पुन्हा वापरता येणार N95 मास्क; केवळ 90 मिनिटांत 'चक्र डिकोव्ह' करणार निर्जंतुक

टॅग्स :Jyotiraditya Scindiaज्योतिरादित्य शिंदेRajasthanराजस्थानcongressकाँग्रेसBJPभाजपा