शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
2
इंडिया आघाडीला किती जागा मिळतील? काँग्रेस नेत्याने थेट आकडाच सांगितला; पहिल्यांदाच केला विजयाचा दावा
3
'अजितदादांना सोबत घेतल्याने भाजपचा मतदार नाराज झाला, पण...'; देवेंद्र फडणवीसांचे मोठं विधान
4
सांगलीच्या निर्णयात घाई केली; भाजपा प्रवेशाबाबत विश्वजित कदमांचं मोठं विधान
5
SBI'ने ग्राहकांना दिली भेट! एफडीवरील व्याजदरात केली मोठी वाढ, पाहा नवे दर
6
प्रकाश आंबेडकरांचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला; "तुमच्याकडे कुठली वॉशिंग मशिन..."
7
Corona Virus : चिंताजनक! भारतात आला कोरोनाचा नवा व्हेरिएंट; 'ही' आहेत लक्षणं, लोकांसाठी किती धोकादायक?
8
तुमच्या स्मार्टफोनसाठी कोणता स्क्रीन गार्ड बेस्ट; 50 रुपयांपासून मिळतात, पण...
9
Mallikarjun Kharge : "जनतेने घेतला मोदींची पाठवणी करण्याचा निर्णय, इंडिया आघाडी 4 जूनला सरकार स्थापन करणार"
10
१०० वर्षांनी अद्भूत त्रिग्रही योग: ५ राशींना शुभ, धनलाभाची संधी; नोकरीत प्रगती, उत्तम काळ!
11
Durgashtami : दर महिन्यातील दुर्गाष्टमीला 'या' चुका आवर्जून टाळा; होऊ शकतात विविध अपाय!
12
LIC Big News: 'या' वृत्तानंतर एलआयसीच्या शेअरमध्ये जोरदार तेजी, गुंतवणूकदारांच्या उड्या
13
RR vs PBKS : राजस्थान रॉयल्सचा प्ले ऑफसाठी 'सराव', सॅमसनच्या संघासमोर पंजाब किंग्सचे आव्हान
14
नरेंद्र मोदी VS राहुल गांधीः कुणाकडे जास्त संपत्ती? किती सोनं, किती कॅश? कुठे आहे गुंतवणूक? जाणून घ्या सर्वकाही
15
प्रफुल्ल पटेलांनी मोदींना जिरेटोप घातल्याने नवा वाद; भाजप म्हणतं, 'यात त्यांचा काय दोष?'
16
मोठा नफा कमावण्यासाठी शेअर बाजारात Investment करताय? गुंतवणूक करताना 'या' सात चुका टाळा!
17
चंदू चॅम्पियन येतोय! कार्तिक आर्यनच्या सिनेमाचं पहिलं पोस्टर रिलीज, चाहत्यांमध्ये उत्सुकता
18
मुस्लीम संसदेत पोहचला पाहिजे ही तुमची जबाबदारी; प्रकाश आंबेडकरांचं समाजाला आवाहन
19
जिथं मोदी जातील तिथं मविआ जिंकेल, संजय राऊतांचा दावा; भाजपावरही साधला निशाणा
20
ज्योतिरादित्य शिंदेंना मातृशोक; राजमाता माधवी राजेंचे दिल्ली एम्समध्ये निधन

वर्षभरात एकही राष्ट्रीय युवा पुरस्कार नाही; उद्दिष्टाला हरताळ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2020 3:03 AM

केंद्रीय युवा कार्य व क्रीडा मंत्रालय। युवावर्गाचा सहभाग लाभणार कसा?

सीमा महांगडे 

मुंबई : युवा आणि किशोरवयीन मुलांच्या विकासासाठी राबविल्या जाणाऱ्या राष्ट्रीय कार्यक्रमांतर्गत दिल्या जाणाºया राष्ट्रीय युवा पुरस्काराची संख्या यंदाच्या वर्षात शून्य असल्याचे केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य व क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावरील माहितीवरून स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर देशाच्याजडणघडणीमध्ये तरुण वर्ग किंवा युवा यांचा सहभाग कसा लाभणार, हा प्रश्न उपस्थित झाला आहे.

देशाच्या जडणघडणीमध्ये युथ पॉवर म्हणजे तरुणाईच्या शक्तीच्या योग्य तो वापर करून घेणे ही यंदाच्या राष्ट्रीय युवा दिनाची संकल्पना आहे. मात्र, देशाच्या तरुणाईसाठी काम करणाºया विभागाकडून किंवा त्या अंतर्गत असणाºया उपक्रमाद्वारे युवावर्गाची उपेक्षा होत असेल, तर या संकल्पनेचे उद्दिष्ट कसे साध्य होणार, हा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

केंद्रीय मंत्रालयाच्या युवा कार्य आणि क्रीडा मंत्रालयाच्या संकेतस्थळावर उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार, युवा नेतृत्वासाठी जेकार्यक्रम आयोजित केले जातात, त्यांची वर्षभरातील संख्या केवळ ३,४४५ इतकी असून, त्यामध्ये २६,२९,८८२ इतके सहभागी विद्यार्थीझाले. तर सप्टेंबर-आॅक्टोबर २०१९ मध्ये एकही युथ पार्लमेंट कार्यक्रम आयोजित करण्यात आला नव्हता. राष्ट्रीय सेवा योजना (नॅशनल सर्व्हिस स्कीम) म्हणजेच एनएसएसमध्ये देशभरातून केवळ वर्षभरात ३९,२५,५०० विद्यार्थ्यांची नोंदणी झाली. त्यातील ४८ हजार विद्यार्थ्यांनी देशभरात झालेल्या विविध जनजागृतीपर उपक्रमांत सहभाग नोंदविल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होत आहे. यावरून देशाच्याजडणघडणीत विद्यार्थ्यांना सामावून घेण्यासाठी राज्यस्तरावर आणि केंद्रीय स्तरावर युवामंत्रालय कमी पडत असल्याचे दिसून येते.

राष्ट्रीय युवा दलामध्ये युवा स्वयंसेवक म्हणून वर्षभरातील ६,५६५ इतक्या विद्यार्थ्यांची नोंदणी झाली असून, त्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. मात्र, देशातील केवळ ६ हजार विद्यार्थी विविध उपक्रमांसाठी स्वयंसेवक म्हणून काम करण्याची इच्छा दाखवित असून, ही खेदजनक बाब या आकडेवारीवरून समोर येते.