There is no mutually agreed Line of Actual Control between India & China | आपलं नौदलही अनेकदा चिनी हद्दीत जातं- राजनाथ सिंह
आपलं नौदलही अनेकदा चिनी हद्दीत जातं- राजनाथ सिंह

नवी दिल्ली: अंदमान- निकोबार बेटावरील पोर्ट ब्लेअरजवळ शी यान 1 चीनचे जहाज भारताच्या सागरी हद्दीत परवानगीशिवाय घुसल्यानंतर भारतीय नौदलाने हुसकावून लावले होते. भारतीय नौदलाच्या हालचाली आणि कारवाई यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी या जहाजाचा चीनकडून वापर करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र यावर भारत आणि चीन या दोन्ही देशांमध्ये नियंत्रण रेषा (एलएसी)वरुन संभ्रम असल्याचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी आज लोकसभेत सांगितले.

भारतीय सागरी हद्दीत चीनी जहाज घुसल्याने लोकसभेत आज काँगेसचे नेते अधीर रंजन चौधरी यांनी प्रश्न उपस्थित केला होता. यावर सागरी सीमारेषेवर अनेक जागांवर अजूनही संभ्रम आहे. त्यामुळे अनेकवेळी चीनचे जहाज भारताच्या हद्दीत, तर भारतीय जहाज चीनच्या हद्दीत जाण्याचे अनेकवेळा प्रकार घडले आहेत. तसेच भारत- चीन सीमेवर भारताकडून रस्ते, बोगदे, रेल्वेमार्ग आणि विमानतळ यासारख्या पायाभूत सुविधा विकसित करण्याचे काम करत असल्याचे देखील राजनाथ सिंह यांनी स्पष्ट केले आहे. 

भारतीच नौदलाच्या हालचाली आणि कारवायांवर लक्ष ठेवण्यासाठी हेरगिरी करण्यासाठी या जहाजाचा चीनकडून वापर होऊ शकतो असे सांगण्यात येत होते. नूडलच्या विमानाला भारताच्या आर्थिक क्षेत्रात (एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोन) चिनी जहाज सापडले. त्यावेळी भारतीय नौदलाकडून या जहाजावर लक्ष ठेवण्यासाठी युद्धनौका पाठवण्यात आली.आंतराष्ट्रीय सागरी कायद्यानुसार अशा प्रकारे कुठल्याही देशाच्या एक्सक्लुसिव्ह इंडियन इकॉनॉमी झोनमध्ये परवानगीशिवाय दुसऱ्या देशाचे जहाज प्रवेश करू शकत नाही.  नौदलाच्या युद्धनौकेने या जहाजाला भारतीय सागरी हद्दीबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर शी यान १ हे चिनी जहाज भारतीय सागरी हद्दीतून बाहेर पडले. अलीकडेच भारतीय समुद्रात पी - ८आय या टेहळणी करणाऱ्या नौदलाच्या विमानाने चिनी ७ युद्धनौका हेरल्या होत्या. 

Web Title: There is no mutually agreed Line of Actual Control between India & China

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.