शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
3
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
4
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
5
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
6
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
7
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
8
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
9
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
10
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
11
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
12
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
13
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
14
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
15
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
16
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
17
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
18
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
19
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
20
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
Daily Top 2Weekly Top 5

केंद्राच्या संमतीशिवाय यापुढे राज्यांमध्ये लॉकडाऊन नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2020 06:23 IST

गृह विभागाचे स्पष्ट निर्देश; कोरोनाला रोखण्यासाठी नवी मार्गदर्शक तत्त्वे

नवी दिल्ली : राज्यांना आता केंद्राच्या संमतीविना लॉकडाऊन लावता येणार नाही. कंटेनमेन्ट झोनमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करता येईल, असे केंद्रीय गृह  विभागाने कोरोना प्रतिबंधासाठी जारी केलेल्या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटले आहे. त्यांची अंमलबजावणी १ ते ३१ डिसेंबरपर्यंत केली जाणार आहे. प्रतिबंधित क्षेत्रामध्ये नियमांचे काटेकोर पालन करावे, असेही या नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलेले  आहे. देशातील कोरोना स्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची एक बैठक मंगळवारी आयोजिण्यात आली होती. 

डायनॅमिक कंटेनमेन्ट झोन स्थापन करण्याची गरज असल्याचे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी  या बैठकीत सांगितले होते. त्यामुळे जिल्हा प्रशासनाकडून असे कंटेनमेन्ट झोन कोणते आहेत, याची निश्चिती करून घ्या, अशी सूचना शहा यांनी राज्ये व केंद्रशासित प्रदेशांना केली होती.

राज्यांना दक्षता घेण्याच्या सूचनाभारतात योग्यवेळी उपाययोजना केल्यामुळे कोरोना साथीने खूप मोठे नुकसान झालेले नाही. हे मिळालेले यश यापुढेही कायम राहील अशी दक्षता घ्यायची आहे, असे  केंद्र सरकारने सर्व राज्यांना बजावले आहे. 

कंटेनमेन्ट झोनमध्ये राज्यांना रात्रीची संचारबंदी लागू करता येईल. या झोनमधील स्थितीवर राज्यांना अधिक बारीक लक्ष ठेवावे लागेल. त्यासाठी यंत्रणा आणखी मजबूत करायला हवी. लक्षण असलेल्या रुग्णांचा वैद्यकीय पथके घरोघरी जाऊन शोध घेतील.कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींवर त्वरित उपचार सुरू करावेत. शक्य असल्यास घरामध्ये विलगीकरणात ठेवावे किंवा रुग्णालयात दाखल करावे.

लॉकडाऊन किंवा अन्य निर्बंधांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस तसेच जिल्हा प्रशासनावर असेल. कंटेनमेन्ट झोनमधील लोकांच्या हालचालींवर नियंत्रणे आणावीत. वैद्यकीय व अन्य अत्यावश्यक कारण वगळता कोणालाही या झोनमधून बाहेर जाऊ देऊ नये. जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यात खंड पडणार नाही याची दक्षता घ्यावी.

जिल्ह्यांमध्ये जितके कंटेनमेन्ट झोन असतील त्यांची यादी राज्यांनी त्यांच्या संकेतस्थळावर द्यावी. ती यादी केंद्रीय आरोग्य विभागालाही द्यावी.कोरोनाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची यादी तयार करावी. त्यांना क्वारंटाइनमध्ये ठेवावे.

 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAmit Shahअमित शहा