शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
3
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
4
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
5
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
6
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
7
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
8
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
9
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
10
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
11
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
12
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
13
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
14
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
15
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
16
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
17
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
18
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
19
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
20
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
Daily Top 2Weekly Top 5

'पद्मावत'मध्ये 300 कट्स नाहीत, प्रसून जोशींनी दिलं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2018 12:45 IST

संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात 300 कट्स सुचवल्याच्या वृत्ताला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नकार दिला आहे.

मुंबई- संजय लीला भन्साळी दिग्दर्शित 'पद्मावत' सिनेमात 300 कट्स सुचवल्याच्या वृत्ताला सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी नकार दिला आहे. सिनेमात 300 कट्स सुचविले नसल्याचं प्रसून जोशी यांनी म्हंटलं.  'निर्मात्यांनी फक्त पाच बदलांसह पद्मावत सिनेमा जमा केला असून त्याला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' अशी माहिती प्रसून जोशींनी दिली.

'सल्लागार समितीच्या टिपण्या, सूचना आणि समाजाच्या भावना लक्षात घेण्याचा प्रयत्न केला आहे. सेन्सॉर बोर्डाला याबाबत आधीच माहिती देण्यात आली होती आणि सिनेमाला यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे' असं प्रसून जोशी यांनी सांगितलं. सीबीएफसीची प्रक्रिया पूर्ण झाली असून 300 कट्स केल्याचं वृत्त चुकीचं असल्याचा दावा प्रसून जोशींनी केला आहे. सेन्सॉर बोर्डाला नाहक बदनाम केलं जात असल्याचंही जोशी म्हणाले.

'पद्मावत' सिनेमात दिल्ली, चित्तोड आणि मेवाडशी संबंधित सर्व संदर्भ हटवण्याचे आदेश दिले होते, त्यानंतर सिनेमात 300 कट्स करण्यात आले, अशी माहिती समोर आली होती. पण सेन्सॉर बोर्डाने केवळ पाच बदल सुचवून  यू/ए सर्टिफिकेट दिलं आहे, असं प्रसून जोशी म्हणाले.

25 जानेवारी रोजी पद्मावती हा सिनेमा 'पद्मावत' या नावाने प्रदर्शित होणार आहे. पण राजस्थान सरकार हा सिनेमा प्रदर्शित होऊ न देण्यावर ठाम आहे. राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांनी 'पद्मावत' प्रदर्शित होऊ न देणार असल्याचं सांगितलं आहे. दुसरीकडे राजपूत संघटना करणी सेनेनेही 'पद्मावत' प्रदर्शित केल्यास गंभीर परिणामांना सामोरं जावं लागेल, अशी धमकी दिली आहे.

टॅग्स :Padmavatपद्मावतPadmavatiपद्मावतीSanjay Leela bhansaliसंजय लीला भन्साळी