पुणे विमानतळाला टिळकांचे नाव देण्याचा प्रस्तावच नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 29, 2022 06:57 IST2022-03-29T06:56:55+5:302022-03-29T06:57:31+5:30

असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठविला आहे काय, असा मुद्दा प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला होता.

There is no proposal to name Pune Airport after Tilak | पुणे विमानतळाला टिळकांचे नाव देण्याचा प्रस्तावच नाही

पुणे विमानतळाला टिळकांचे नाव देण्याचा प्रस्तावच नाही

नवी दिल्ली : पुणे विमानतळाचे नाव लोकमान्य टिळक करण्यासाठी महाराष्ट्र सरकारचा कोणताही प्रस्ताव आलेला नाही, असे केंद्र सरकारने सोमवारी स्पष्ट केले. नागरी उड्डयण मंत्रालयाने राज्यसभेत स्पष्ट केले की, विमानतळांचे नामकरण, नाव बदलणे याबाबत विधानसभेत मंजूर झालेल्या प्रस्तावासह राज्य सरकारने शिफारस केल्यास यावर विचार केला जातो. 

असा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठविला आहे काय, असा मुद्दा प्रकाश जावडेकर यांनी उपस्थित केला होता.

Web Title: There is no proposal to name Pune Airport after Tilak