मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2025 13:16 IST2025-12-03T13:14:41+5:302025-12-03T13:16:40+5:30
सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे.

मुंबईला आर्थिक केंद्र बनवण्याचा प्रस्ताव नाही; केंद्र सरकारने केले स्पष्ट
- हरीश गुप्ता, नवी दिल्ली
केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की, गिफ्ट सिटी व्यतिरिक्त, मुंबईला सिंगापूर, दुबई आणि हाँगकाँगसारख्या केंद्रांच्या बरोबरीने जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आर्थिक केंद्र म्हणून विकसित करण्याचा कोणताही प्रस्ताव विचाराधीन नाही.
सरकारने एमएसएमई, स्टार्टअप्स आणि इतरांसाठी अनुपालन सुलभता वाढविण्यासाठी अनेक पावले उचलल्याचा उल्लेख केला आहे.
अनेक प्रोत्साहने उपलब्ध करून दिली आहेत
फेसलेस असेसमेंट, केस मॅनेजमेंट सिस्टम आणि विवाद से विश्वास योजना यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. स्टार्टअप क्षेत्रासाठी व इतर उद्योगांसाठी अनेक प्रोत्साहने उपलब्ध करून देण्यात आली आहेत.
पात्र स्टार्टअप्ससाठी नफा-आधारित कर वजावटीची सुविधा, पात्र स्टार्ट-अपसाठी कॅरी-फॉरवर्ड आणि तोट्याच्या सेट-ऑफमध्ये सवलत, एंजेल टॅक्स रद्द करणे, लघु व सूक्ष्म उद्योगांना वेळेत देयक मिळावे यासाठी आयकर कायद्यात दुरुस्ती यांचा समावेश आहे. भाजप खासदार मिलिंद देवरा यांनी राज्यसभेत प्रश्न उपस्थित केला होता.