काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2025 05:44 IST2025-07-03T05:42:19+5:302025-07-03T05:44:25+5:30
आयसीएमआर, एम्सच्या अभ्यासातील निष्कर्ष

काेराेना लस अन् हृदयविकाराचा संबंध नाही; जीवनशैली, आनुवंशिक दाेष हेच कारणीभूत
नवी दिल्ली : कोरोना लसीकरण व हृदयविकाराने होणारे मृत्यू यांचा काहीही परस्पर संबंध नाही, असे भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) केलेल्या अभ्यासातून निष्पन्न झाल्याचे केंद्र सरकारने बुधवारी सांगितले. कर्नाटकातील हासन जिल्ह्यात हृदयविकाराने होणाऱ्या मृत्यू व कोरोना लसीकरणाचा संबंध असू शकतो, असा दावा त्या राज्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला होता. त्या पार्श्वभूमीवर केंद्राने हे वक्तव्य केले.
"दहशतवादी हल्ला झाला, तर आम्ही जशास तसे उत्तर देणार"; जयशंकर यांनी अमेरिकेतून पाकिस्तानला फटकारलं
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी सांगितले की, गेल्या महिन्यात केवळ हासन जिल्ह्यात २० हून अधिक लोकांचा हृदयविकारामुळे मृत्यू झाला. ही घटना राज्य सरकारने गांभीर्याने घेतली आहे.
काय आढळले अभ्यासात?
एखाद्याला आरोग्यविषयक समस्या, आनुवंशिक कारणे, धोकादायक जीवनशैली या गोष्टी अकस्मात मृत्यूस कारणीभूत ठरू शकतात असे या अभ्यासाच्या निष्कर्षात म्हटले आहे.