देशात दोनच खलनायक, एक मुसलमान अन् दुसरा सवर्ण..; भाजपा नेते बृजभूषण सिंह यांच्या विधानानं वाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2026 16:55 IST2026-03-28T16:54:38+5:302026-03-28T16:55:10+5:30

जे लोक आपल्यासोबत चालायला तयार आहेत त्यांना सोबत घ्यायला हवे असं बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

There are only two villains in the country, one Muslim and the other upper caste..; BJP leader Brij Bhushan Singh statement sparks controversy | देशात दोनच खलनायक, एक मुसलमान अन् दुसरा सवर्ण..; भाजपा नेते बृजभूषण सिंह यांच्या विधानानं वाद

देशात दोनच खलनायक, एक मुसलमान अन् दुसरा सवर्ण..; भाजपा नेते बृजभूषण सिंह यांच्या विधानानं वाद

गोंडा - उत्तर प्रदेशातील कैसरगंज येथे भाजपा नेते माजी खासदार बृजभूषण सिंह यांच्या नव्या विधानानं वाद निर्माण झाला आहे. देशात आज दोनच खलनायक आहेत, पहिला मुसलमान आणि दुसरा सवर्ण..असं त्यांनी म्हटलं. बृजभूषण सिंह यांच्या या विधानाचा व्हिडिओ सोशल मीडियात चांगलाच व्हायरल झाला आहे. रामनवमीच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. बृजभूषण सिंह यांच्या विधानावरून राजकीय वातावरण तापले आहे.

बृजभूषण सिंह म्हणाले की, आज आपल्या देशाच्या आतमध्ये २ खलनायक आहेत, मला ठाऊक आहे माझ्या बोलण्याने अनेकांना वेदना होतील. सर्व समस्या केवळ मुसलमानांच्या आहेत. त्यामुळे पहिला खलनायक मुसलमान आहे परंतु दुसरा खलनायक या देशातील सवर्ण आहे. सर्व समस्या मुसलमानांमुळे होते, त्यांच्यासोबत कोण उभे राहते? भारतीय जनता पार्टी सोडून सर्व पक्ष त्यांच्यासोबत उभे राहतात. मग सवर्णांसोबत उभं राहणारा कोण आहे? असा प्रश्न त्यांनी उपस्थितांना केला, त्यावर लोकांनी एका सुरात कोणच नाही असं म्हटलं, त्यावर बृजभूषण सिंह यांनी मग पहा, झाला ना खलनायक..असं त्यांनी म्हटलं.

त्यानंतर बृजभूषण सिंह यांनी एक शायरी वाचली. इतने गहरे घाव कहां से आए होंगे, लगता है तुमने भी दोस्त बनाए होंगे..त्यांनी सवर्णांसोबत होणारी अवस्था या शायरीशी जोडली. रामनवमीच्या निमित्ताने प्रभू रामांनी सांगितलेल्या मार्गावर लोकांनी चालावे असा आग्रह त्यांनी केला. आपल्याला आपलं पाहावे लागेल, लाज सोडून पुढे जावे लागेल. सर्वांना सोबत जोडावे लागेल. रामाने केवट, ऋषि भारद्वाज, आदिवासी, जंगलवासी आणि वनवासी यांना जोडले होते. प्रभू रामाने आपल्याला सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याचा मार्ग दाखवला आहे. जे लोक आपल्यासोबत चालायला तयार आहेत त्यांना सोबत घ्यायला हवे असं बृजभूषण सिंह यांनी सांगितले.

दरम्यान, आमच्या पूर्वजांनी आमच्यासाठी खूप काही मागे ठेवले आहे असंही बृजभूषण सिंह यांनी म्हटलं. माजी खासदार बृजभूषण सिंह अलीकडे मुस्लिमांविषयी वारंवार वक्तव्ये करत आहेत. बिहारच्या बरह विधानसभा मतदारसंघात आयोजित एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी हे वक्तव्य केले. जे सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. 

Web Title : भाजपा नेता सिंह का विवादित बयान: मुसलमान, सवर्ण खलनायक!

Web Summary : भाजपा नेता बृजभूषण सिंह ने रामनवमी कार्यक्रम में विवादित बयान दिया: मुसलमान और उच्च जाति के हिंदू देश के खलनायक हैं। उन्होंने सवाल किया कि उच्च जातियों का समर्थन कौन करता है, जिससे राजनीतिक आक्रोश फैल गया। सिंह की टिप्पणी, संबंधित कविता सहित, ऑनलाइन प्रसारित हो रही है।

Web Title : BJP Leader Singh Sparks Controversy: Muslims, Upper Castes are Villains.

Web Summary : BJP leader Brijbhushan Singh's controversial statement at a Ram Navami event claims Muslims and upper-caste Hindus are the country's villains. He questioned who supports the upper castes, sparking political outrage. Singh's remarks, including a related poem, are circulating widely online.