शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
2
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
3
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
4
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
5
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
6
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
7
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
8
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
9
इराणकडून आखाती देशांच्या तोंडचं पाणी पळवण्याची तयारी, पाणी आणि गॅस प्रकल्पांवर हल्ले, नव्या चालीमुळे खळबळ
10
बच्चू कडूंनी रचला खुनाचा कट? आमदार प्रवीण तायडेंचा ऑडिओ क्लिपसह खळबळजनक दावा
11
SIP की एकरकमी गुंतवणूक? १ कोटींचा टप्पा गाठण्यासाठी सर्वात सोपा मार्ग कोणता? पाहा गणित
12
Chanakya Niti: शून्यातून विश्व निर्माण करायचंय? आचार्य चाणक्यांचे 'हे' १० विचार तुम्हाला नक्कीच दिशा देतील
13
९० दिवसांत २८ मृत्यू, मग पुजाऱ्याने दिला 'असा' सल्ला, संपूर्ण गाव झाला रिकामी, आता...  
14
काँग्रेस नेते राजेंद्र भारती यांची आमदारकी रद्द! २७ वर्षांपूर्वीचे प्रकरण काय, ज्यामुळे गमावले विधानसभा सदस्यत्व?
15
FASTag Annual Pass: "पैसे वाया घालवू नका! 'या' हायवेवर आता FASTag वार्षिक पास चालणार नाही; नवीन यादी जाहीर
16
आई वडिलांना न सांभाळणाऱ्या कर्मचाऱ्यांची खैर नाही; १५% पगार कापणार, तेलंगणा सरकारचा निर्णय
17
पगार झाला की खिशाला 'कात्री'? महिनाअखेरची ओढताण टाळण्यासाठी 'हे' ५ आर्थिक मंत्र नक्की पाळा
18
PSL 2026: भर मैदानात डेव्हिड वॉर्नर- मोईन अली यांच्यात तू-तू मैं-मैं; व्हिडीओ व्हायरल, नेमकं काय घडलं?
19
होर्मुझच्या 'टोलनाक्या'वरच अमेरिकेचा सर्जिकल स्ट्राईक! इराणच्या केशम बेटावर दणादण बॉम्बवर्षाव; सॅटेलाईट फोटोंनी फुटले भांडे
20
"मी झोपलेले, तो माझ्या खोलीत आला"; अब्रू वाचवण्यासाठी अभिनेत्रीने इमारतीतून मारली उडी
Daily Top 2Weekly Top 5

... तर मिळणार नाही अभियांत्रिकी पदवी, अखिल भारतीय तांत्रिक शिक्षण परिषदेची माहिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2018 03:47 IST

अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-यांना पदवी घेण्यासाठी आता इंटर्नशीप करणे बंधनकारक असेल. ते ज्या शैक्षणिक संस्थेत आहेत तेथे एका टप्प्याची इंटर्नशीप झाल्यानंतर...

संतोष ठाकूर नवी दिल्ली : अभियांत्रिकीचे शिक्षण घेणा-यांना पदवी घेण्यासाठी आता इंटर्नशीप करणे बंधनकारक असेल. ते ज्या शैक्षणिक संस्थेत आहेत तेथे एका टप्प्याची इंटर्नशीप झाल्यानंतर वेगवेगळ्या खासगी कंपन्या, सामाजिक संस्था आणि स्वयंसेवी संस्थांत राहिलेली इंटर्नशीप पूर्ण करावी लागेल. ते ज्या ठिकाणाहून इंटर्नशीप करतील ते सरकारकडून केवळ मान्यताप्राप्तच ठरतील असे नाही तर अशा संस्था असतील की ज्या त्यांना नोकरीही देतील.केंद्रीय मानव संसाधन मंत्री प्रकाश जावडेकर यांच्याशी ‘लोकमत’ने केलेल्या विशेष चर्चेतून या बदलाची माहिती जवळपास महिनाभरापूर्वीच दिली होती. जावडेकर म्हणाले होते की, सगळे तांत्रिक-अभियांत्रिकी अभ्यासक्रम जवळपास ४०-५० वर्षे जुने आहेत. तेव्हापासून या क्षेत्रांत (विज्ञान व तंत्रज्ञान) खूप बदल घडले आहेत. त्यामुळे आम्ही दरवर्षी अभ्यासक्रम बदलाचे काम करीत आहोत. यात इंटर्नशीपला जास्त महत्व देताना उद्योगांशी थेट करार केले जातील. त्यात मुलांनी असे शिक्षण घ्यावे की ज्यामुळे त्यांना नोकरी व रोजगाराची संधी प्राप्त होईल.एआयसीटीईच्या वरिष्ठ अधिका-याने सांगितले अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना आता फक्त ४-६ आठवड्यांची उन्हाळी इंटर्नशीप आवश्यक असेल. पहिल्या टप्प्यातील इंटर्नशीप विद्यार्थी जेथे शिकतो तेथेच करावी लागेल. दुसºया टप्प्याची इंटर्नशीप औद्योगिक क्षेत्र, कंपनी, अशासकीय संस्थांत करावी लागेल. इंटर्नशीपच्या प्रमाणपत्रातील फसवणूक टाळण्यासाठी विद्यार्थी जेथे इंटर्नशीप करीत आहे तेथूनच त्याच्या उपस्थितीबद्दल त्याच्या संस्थेला माहिती मिळावी असा विचार केला जात आहे.