... तर देशातील शेतकरी मोदी, शहांना पुन्हा चहा-पकोडे विकण्यास भाग पाडेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2018 16:33 IST2018-09-07T16:32:55+5:302018-09-07T16:33:41+5:30

खासदार राजू शेट्टी आणि अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन गेल्या १४ दिवसापासून उपोषणास बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची भेट घेतली. 

... then farmers will send narendra Modi, amit shah to sell tea and pakode again | ... तर देशातील शेतकरी मोदी, शहांना पुन्हा चहा-पकोडे विकण्यास भाग पाडेल

... तर देशातील शेतकरी मोदी, शहांना पुन्हा चहा-पकोडे विकण्यास भाग पाडेल

अहमदाबाद : खासदार राजू शेट्टी व अखिल भारतीय किसान समन्वय समितीचे प्रमुख व्ही. एम. सिंग यांनी अहमदाबाद येथे जाऊन गेल्या १४ दिवसापासून उपोषणास बसलेले पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांची भेट घेतली. 



यावेळी बोलताना खासदार राजू शेट्टी म्हणाले कि गेल्या १४ दिवसापासून सुरू असलेल्या या उपोषणाकडे सरकारने दुर्लक्ष केले असून हार्दिक पटेल यांच्या जीवाला काही बरे वाईट झाल्यास देशातील शेतकरी एक होऊन मोदी व अमित शहा यांना गुजरातमध्ये पाठवून पुन्हा चहा व पकोडे विकण्यास भाग पाडतील. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी २५ वर्षांचा तरूण आपला जीव पणाला लावून गेल्या १४ दिवसांपासून उपोषणास बसलेला आहे. ज्याप्रमाणे तामिळनाडूतील शेतकऱ्यांचे आंदोलन मोडीत काढले. त्याचप्रमाणे हे आंदोलन माध्यमांची मुस्कटदाबी करून मोडीत काढण्याचा डाव सरकार करत आहे. 


यावेळी खासदार राजू शेट्टी व व्ही. एम. सिंग यांनी देशातील शेतकऱ्यांना एकत्रित करून त्या शेतकऱ्यांचा लढ़ा देशभर उभारण्यासाठी तरूण युवकांची गरज असून हार्दिक पटेल यांनी उपोषण मागे घेण्याची विनंती केली.

Web Title: ... then farmers will send narendra Modi, amit shah to sell tea and pakode again