राम सुतार यांच्या घरी २४ लाखांची चोरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 05:59 IST2021-03-12T05:58:35+5:302021-03-12T05:59:02+5:30

घरातील रोकड आणि दागिने मिळून २४ ते २७ लाख रुपयांची चोरी झाली आहे.

Theft of Rs 24 lakh from Ram Sutar's house | राम सुतार यांच्या घरी २४ लाखांची चोरी

राम सुतार यांच्या घरी २४ लाखांची चोरी

नोएडा (उत्तर प्रदेश) : जागतिक कीर्तीचे शिल्पकार राम सुतार यांच्याघरी झालेल्या मोठ्या चोरीचा तपास नोएडा पोलीस करीत असून, याप्रकरणी त्यांच्या घरातील नोकरावर गुन्हा दाखल झाला. तो सध्या फरार आहे, असे नोएडा पोलीस अधिकाऱ्याने गुरुवारी सांगितले.

घरातील रोकड आणि दागिने मिळून २४ ते २७ लाख रुपयांची चोरी झाली आहे. गुजरातमधील प्रसिद्ध स्टॅच्यू ऑफ युनिटीचे सुतार हे शिल्पकार असून ते कुटुंबासह येथील सेक्टर १९ भागात राहतात. सुतार यांच्या घरी साधारण दोनच आठवड्यांपूर्वी नोकर म्हणून काम करीत असलेल्यावर या चोरीप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.

Web Title: Theft of Rs 24 lakh from Ram Sutar's house